मित्रांनो
,

स्वरलेखन म्हणजे एखाद्या गाण्याचं नोटेशन लिहिणं. म्हणजेच त्या गाण्याची चाल ज्यामुळे तयार होतेते स्वर लिहिणं. यासाठी जी पद्धत वापरली जातेत्याला म्हणतात स्वरलिपी पद्धती. यामध्ये गाण्याची चाल तयार करणारे स्वरही लिहिले जातात आणि गाणं ज्या तालात आहेत्या तालात (रिदममध्ये) ते लिहिलं जातं. यालाच गाणं स्वरलिपीबद्ध करणं असं म्हणतात. इंग्रजीमध्ये जसं स्पेलिंग लिहिलं जातं आणि ते स्पेलिंग मनात ठेवूनबोलताना फक्त त्याप्रमाणे उच्चार केला जातोतसंच गाण्याची चाल तयार करणारे स्वर मनात ठेवूनगायन-वादन केलं जातं. हे स्वर आणि ताल समजून घेऊन गाणं बसवलं जातं आणि लिहिलं जातं. स्वरलिपीबद्ध केलेलं गाणंपुन्हा म्हणताना किंवा दुसऱ्याला शिकवतानातसंच येण्यासाठी ही स्वरलिपी अचूक मार्गदर्शन करते.

कोणत्याही कलेतशास्त्र आणि कला (थिअरी आणि प्रॅक्टिकल) हातात हात घालूनच चालतात. म्हणजेच संगीत शिकताना त्याची शास्त्रीय माहितीही बरोबरीनंच शिकायची असते. कारण शास्त्राचा पाया पक्का होणं खूप महत्त्वाचं असतं. एकदा का तुमचा पाया पक्का झाला की, पुढे आयुष्यभर तुम्हाला संगीताचे वेगवेगळे फाॅर्म्स हाताळणं आणि विविध प्रकारे काम करणं सोपं होऊन जातं. त्यामुळेच शिकलेले रागत्यांचे स्वर विस्तारबंदिशीची अचूक चाल हे पद्धतशीरपणे लिहून ठेवण्यासाठी ही स्वरलेखन पद्धती उपयोगी पडते.

सुरुवातीपासूनच नोटेशन वाचतां येणंनोटेशन करता येणं याची सवय लावून घेतली तरपुढे संगीताच्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचं काम करताना याचा उपयोग निश्चितच होतो.

पूर्वीच्या काळीम्हणजे साधारण ३५० वर्षांपूर्वीगुरूंच्या सहवासात राहूनगुरुकुल पद्धतीनं संगीत शिकत असत. गुरू जेव्हा शिष्याला एखादा रागत्यांतील बंदीश (रागातील गीत) शिकवायचेतेव्हा ते शिष्यानं लगेच आत्मसात करावयाचं आणि लक्षात ठेवायचं अशी पद्धत होती. शिष्यही फक्त गाणं एके गाणं करत असल्यानेत्यांना ते शक्यही होतं. त्या काळी ते लिहून ठेवण्याची सोय नव्हती. फार तर बंदिशींचे शब्द लिहून ठेवायचे, तेही गुरूंच्या समोर नाही. शिवाय एखादा शब्द समजला नाही तर पुन्हा विचारायची सोय नाहीकारण ते खूप तापट असत. त्यामुळे चुकीचे शब्द तसेच राहायचे.

या गोष्टींवर विचार करूनविसाव्या शतकाच्या सुरुवातीला गायनाचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीतातील स्वरलेखनाची पद्धत म्हणजेच स्वरलिपी तयार केली. कोमल - तीव्र स्वरांसाठी चिन्हंतीन सप्तकातील स्वरांसाठी चिन्हंताल - खंड - सम - काल यासाठी चिन्ह. यामुळे बंदीश तालबद्ध लिहून तिची चाल ज्यामुळे तयार होते ते बंदिशींचे नोटेशनहे सर्व लिहिता येऊ लागलं आणि एकदा शिकलेली बंदीशतशीच्या तशी दुसऱ्याला शिकवता येऊ लागली. समजलेली रागस्वरूपं तशीच्या तशी शुद्ध स्वरूपात पुढच्या पिढीला शिकवायला मदत होऊ लागलीती जतन करता येऊ लागली. अनेक रागांतील हजारो बंदिशींचा संग्रह करून ठेवता येऊ लागला.

गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनीही स्वरलेखन पद्धती तयार केली. त्यांची पद्धत पाश्चात्य स्वरलिपीप्रमाणे होती. या दोनही स्वरलिपी पद्धतींचासंगीताच्या विद्यार्थ्यांना खूपच उपयोग होऊ लागला. स्वरलिपीबद्ध केलेली एखादी बंदीशअनेक वर्षांनी पुन्हा जशीच्या तशी मूळ स्वरूपात आठवायला मदत होऊ लागली.

संगीत शिकताना माहीत झालेल्या १२ स्वरांमधूनचजगातील कोणत्याही प्रकारचं संगीत तयार होत असतं. त्यामुळे शास्त्रीय बंदिशींप्रमाणेसुगम संगीतातील किंवा सिनेसंगीतातील गाण्यांचंही स्वरलेखन करता येतं. त्याच प्रमाणे गाण्यांच्या मध्ये वाजणारं वाद्यसंगीतही स्वरलिपीत लिहितां येतं. मग रेकाॅर्डिंग करताना किंवा कार्यक्रमात सादर करतानावादकांना हे स्वरलेखन मार्गदर्शक ठरतं. एकाच वेळी वीस पंचवीस व्हायोलीन्ससतारीबासरी जेव्हा एकच म्युझिक पीस वाजवताततेव्हा या स्वरलेखनाचानोटेशन लिहिण्याचाच आधार त्यांना घ्यावा लागतो.

या स्वरलिपीच्या ज्ञानाचा उपयोगसंगीत दिग्दर्शक (म्युझिक डिरेक्टर)संगीत संयोजक (म्युझिक ॲरेंजर)असिस्टंट म्युझिक डिरेक्टर (जो मुख्य कलाकाराव्यतिरिक्त इतर कोरस गाणारे आणि वादक यांच्या रिहर्सल्स घेतो) अशा निरनिराळ्या प्रकारे काम करताना होतो.

एक मात्र लक्षात घ्यायला हवंते म्हणजे काही मर्यादित स्वरूपात ही स्वरलिपी उपयुक्त असलीतरी संगीत ही गुरूंसमोर बसूनतालीम घेत शिकण्याची कला आहे आणि याला पर्याय नाही.

टि.व्ही. वरचे रिअ‍ॅलिटी शोज- लेख १८ ( किशोर गटासाठी )

 - मधुवंती पेठे 
[email protected]