उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, सांगली’ व ‘शिक्षणविवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८साठी ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी सांगली येथे संपन्न होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत. यात १. भाषाःमराठी/हिंदी/इंग्रजी, २.गणित, ३.विज्ञान, ४.कलाःचित्र/नाट्य/शिल्प/संगीत, ५. तंत्रज्ञान हे पाच अध्यापन विषयांतील उपक्रमासाठी पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे. 

विशेष पुरस्कार- ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयात किशोरवयीन मुलींसाठी काम करणारा एक पुरस्कारार्थी. 

 नामांकनासाठीचे निकष व नियम:

* नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय ४० वर्षे असावे. (जन्मदाखल्याची छायाप्रत आवश्यक)

* एका शिक्षकाने केवळ एकाच उपक्रमासाठी नामांकन पाठवावे.

* पहिल्या पाच पुरस्कारांसाठीच्या उपक्रमांचे स्वरूप ज्ञानरचनावादावर आधारित असावे.

* कमीत कमी ५ वर्षे एका विशिष्ट उपक्रमाची अंमलबजावणी करून, त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* हा उपक्रम केवळ एका शाळेपुरता मर्यादित न राहता, अनुकरणीय असावा.

* उपक्रमाद्वारे सर्व विद्यार्थ्यांनी किमान अध्ययन क्षमता प्राप्त केलेली असावी.

* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

नामांकनांसाठी आवश्यक माहित ः

* शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, संपर्क क्रमांक, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन, उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा 'शिक्षण माझा वसा पुरस्कार' दि. २१ जानेवारी २०१७ रोजी दिला गेला.

या कार्यक्रमाची छायाचित्रे आणि चित्रफित पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शिक्षण माझा वसा पुरस्कार २०१७(छायाचित्रे)

शिक्षण माझा वसा पुरस्कार २०१७ (चित्रफित)

वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०. 

दूरध्वनी ०२०-२४४७०१२९/७७०९५८७११९

या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा  [email protected]comया मेलवर दिनांक  १२ डिसेंबर २०१७ पर्यंत पाठवावी.

टीप:- पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्वतंत्र प्रवास, भोजन आणि निवास याकरिता

स्वतंत्र भत्ता दिला जाईल. (केवळ रेल्वे व बस).

या पुरस्कार सोहळ्याबरोबरच 'मासिक पाळी'या विषयावर सामाजिक प्रबोधन करणारी 'कळी उमलताना...' ही कार्यशाळा घेत आहोत.या कार्यशाळेविषयी ..

‘मासिक पाळी’ हा प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा ‘मूलभूत घटक' असतो. पण आपल्याकडे ‘मासिक पाळी’ हा विषय वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्षात घेण्यापेक्षा त्याच्याकडे धार्मिक भूमिकेतूनच पहिले जाते. घाण, ओंगळवाणे, लाजिरवाणे वाटावे असे वर्तन मुलींकडून केले जाते आणि अर्थात ते समाजमान्यही असते. आज २१ व्या शतकात स्त्रिया सगळ्याच क्षेत्रात धडाडीने पुढे जात असतानाही ‘मासिक पाळी’सारख्या विषयाकडे कानाडोळा केला जातो. त्याविषयी बोलण्याचे टाळले जाते. या विषयावरचा संवाद ही काळाची गरज आहे. हे ओळखून ‘शिक्षणविवेक’ आणि ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कळी उमलताना...’ ही कार्यशाळा घेत आहोत. सामाजिक प्रबोधन करणारी ही कार्यशाळा सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरेल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित राहावे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेतील विविध सत्रांचे विषय, वक्ते, वेळ खालीलप्रमाणे