शिक्षकांस... 

दिंनाक: 02 Nov 2017 14:23:21


प्रामाणिक कष्ट करूनही काही वेळेस शिक्षक नाउमेद होतो. आपली समाज व्यवस्था शिक्षकावर सगळा भार टाकून मोकळी होते. पण शिक्षकांचीही एक सकारात्मक बाजू असते, ती नेहमीच काळी रंगवली जाते. अशा शिक्षकास उभारी व प्रेरणा देणारी कविता. प्रत्येक शिक्षकाने वाचावी आणि आपली निराशा झटकून टाकावी अशी ही एका प्रांजळ शिक्षक कवयित्रीची कविता...  

 

रात्र आहे अंधारी ,

इकडे विहीर, तिकडे दरी

शिरजोर होतेय परिस्थिती

घाबरू नकोस तरी !! १ !!

 

होतील आरोप पावलागणिक

ते चुकलेत कुणाला?

सीतेलाही द्यावी लागली अग्निपरीक्षा

कृष्णावर ही झाला आरोप स्यमंतक चोरीचा !! २ !!

 

प्रभू रामचंद्रांनी सोसला वनवास

ज्ञानोबा रायांनी घेतली समाधी

 ताप सोसल्याशिवाय बघा सोनं उजळलंय कधी?  !!३!!

 

तरीही होऊ नको निराश

मंदावू नकोस तुझी चाल

पेटवून दिवा अंतरीचा

अंधारावर कर चाल !!४!

 

विश्वास असू दे स्वतः वर

पेटती ठेव प्रयत्नांची वात

करीत रहा अखंड वाटचाल

करत अनंत संकटांवर मात !! ५ !!

 

 -स्मिता सराफ 

[email protected]