माझ्या छोट्या दोस्तांनो,

आज मी तुमच्यासाठी दोन वेगळ्या प्रकारची गाणी देत आहे.

आत्तापर्यंतची गाणी तुम्ही ऐकलीत, ती आवडल्याचंही सांगितलंत. आवडलेली गाणी तुम्ही म्हणून पण पाहिली असतील. आता आणखी ही दोन गाणी.

आज पहिलं गाणं जे आहे, ती मला आवडलेली एक कविता आहे. निसर्गातील जे निरनिराळे आवाज आपण ऐकतो, ते या कवितेत सांगितले आहेत. त्यावरून झुळझुळ, रिमझिम, झुमझुम, सळसळ, रुणुझुणु, चिवचिव असे नादमय शब्द तुम्हाला माहीत होतील. मला मुळात या कवितेतील हेच शब्द खूप आवडले आणि मी ही कविता माझ्याकडे लिहून ठेवली. पुढे तुमच्यासारख्या छोट्या विद्यार्थ्यांना सा रे ग म असे शुद्ध स्वर शिकवत होते आणि ते पक्के करण्यासाठी काही अलंकार शिकवले जातात. त्यातील तीन तीन स्वरांचा .... सारेग, रेगम, गमप असा अलंकार शिकवता शिकवता या कवितेची चाल मला सापडली. असे तीन तीन स्वर उलटसुलट वापरून ही चाल तयार झाली. त्यामुळे हे गाणं नुसतं ऐकूनही तुम्हाला सहज म्हणतां येईल. या कवितेची आणखी एक गंमत आहे. यातील प्रत्येक ओळीतील शेवटचा शब्द दोन वेळा येतो, त्याचीही एक वेगळीच मजा आहे.

 

आॅडिओ १ - झुळझुळ नाद झऱ्याचा, झऱ्याचा 

 

गीतरचना - गौरी कुलकर्णी.संगीत - मधुवंती पेठे.  गायिका - स्वामिनी जोशी, साना जोशी

 

झुळझुळ  नाद  झऱ्याचा .... झऱ्याचा ।रिमझिम धार पावसाची......पावसाची ।

झुमझुम लय वाऱ्याची ......वाऱ्याची । सळसळ धुन पानांची ......पानांची ।

रुणुझुणु गाणी रानाची.....रानाची । चिवचिव गोड चिमण्यांची .....चिमण्यांची ।।

 

मित्रांनो, २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट आले की, आपल्याला अनेक देशभक्तीपर गीतं ऐकायला मिळतात.

आज मी तुम्हाला एक नवीन गीत देत आहे. मी पहिल्यांदा हे गीत वाचलं, तेव्हा याचेपण शब्द मला खूप आवडले. लहान मुलांना समजण्यासारखे आणि सहज पाठ होण्यासारखे. मग मी चालसुद्धा अगदी सोपी लावली. तुम्हाला नुसती ऐकून म्हणण्यासारखी. गाणं शिकत असणाऱ्यासाठी सांगायचं म्हणजे, राग भूपचे स्वर यांत वापरले आहेत. त्यामुळे सा रे ग प ध अशा पाच शुद्ध स्वरांमधून ही चाल तयार झाली आहे. आणि ताल म्हणजे याचा रिदम आहे, सगळ्या मार्चिंग साॅंगसाठी असतो तोच. तुम्हाला ऐकताना जाणवेलच.

 

आॅडिओ २ -  भारतमाता जगविख्याता ।

 

गीतरचना - अनामिक. संगीत - मधुवंती पेठे.  गायिका - स्वामिनी जोशी, साना जोशी

 

भारतमाता जगविख्याता । तुझ पर हम बलहारी माॅं ।

हम तेरे प्रिय पुत्र है जननी । तूं हम सबकी प्यारी माॅं ।।

 

सबसे उॅंचे मस्तकवाली। मुकुट हिमालयकी छबी न्यारी ।

हरेभरे मैदानोंकी तूं पहने हुए है साडी माॅं । तूं हम सबकी प्यारी माॅं ।।

 

सुंदर शीतल गंगा यही है । नंदनवन प्रिय स्वर्ग यही है ।

बंधुभाव का धन निर्मल है । धन्य धन्य तूं भारत माॅं । तूं हम सबकी प्यारी माॅं ।।

 

बालमित्रांनो, ही दोन्ही गाणी ऐका....म्हणून पहा...........आणि आवडली का मला सांगा.

ही सोपी सोपी गाणी जर तुम्हाला गाता येऊ लागली तर यापेक्षा कठीण गाणी मला पुढच्या वेळी देता येतील.

  बालवयाला शोभणारी गाणी -भाग ४ वाचा खालील लिंकवर 

बालवयाला शोभणारी गाणी -भाग ४

 - मधुवंती पेठे 

[email protected]