वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे [ सीएसआयआर ] शालेय विद्यार्थ्यांसाठीचा 'सीएसआयआर संशोधन पुरस्कार' महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवडच्या वाघीरे विद्यालयातील विद्यार्थिनी तन्मयी आप्पासाहेब कोकरे [ इ. ६ वी ] व तनिष्का आप्पासाहेब कोकरे [ इ. ९ वी ] यांना मंगळवार दि. २६/०९/२०१७ रोजी विज्ञानभवन दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातून तब्बल ४५० अभिनव प्रस्ताव सदर करण्यात आले होते. त्यातून केवळ चार प्रस्तावांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारांच्या श्रेणीत हा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार असून ३० हजार रुपये रोख, मानचिन्ह  आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या दोघींनी तयार केलेल्या 'टू इन वन डस्टबिन ' या नाविन्यपूर्ण उपकरणासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
         नवी दिल्ली विज्ञानभवनात झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभाला केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी आणि सीएसआयआर चे महासंचालक डॉ. गिरीश साहनी उपस्थित होते.