शिक्षण प्रसारक मंडळ मुलींची शिशुशाळा स. प. आवार या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पालक हे मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पालकांनी ही भूमिका बजावताना मुलांना गुणात्मक वेळ कसा द्यावा याबद्दल शिक्षणविवेकसमवेत ‘पालक-बालक गुणात्मक वेळ’ ही कार्यशाळा दिनांक, ७ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळात  घेतली. या वेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री एडगावकर, शिक्षणविवेक प्रतिनिधी शिवानी जोशी उपस्थित होत्या. शिक्षणविवेकच्या समुपदेशक मानसी भागवत या व्याख्यात्या होत्या.

व्याख्यानाची सुरुवात एका नाटुकल्याने केली. या नाटुकल्यातून पालकांच्या मनातील प्रश्न, काळजी पालकांसमोर मांडली गेली, त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण तयार झाले. पालकांनी मुलांबरोबर कशा पद्धतीने संवाद साधावा, मुलांना वेळ कसा द्यावा, त्यात मोकळेपणा कसा असावा, या गुणात्मक वेळेचे नियम कसे ठरवावे यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पालकांनी सहभागी होऊन त्यांचेही अनुभव सांगितले.

या कार्यशाळेतून पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अभ्यासाशिवाय मुलांना एक तास देईन. हा एक तास देताना कसे वागले पाहिजे, हे या व्याख्यानातून खूप छान कळले, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. वेगळ्या पद्धतीने पालकांशी संवाद साधल्याने ही कार्यशाळा खूप आवडल्याचे मुख्याध्यापिका जयश्री एडगावकर यांनी सांगितले.

रुपाली सुरनीस यांनी शिक्षणविवेकच्या स्पर्धांची माहिती सांगितली. व्याख्यानाच्या नंतरच्या भागात शिक्षणविवेक दिवाळी अंक प्रकाशान पालक, मुले, जयश्री एडगावकर व मानसी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

-प्रतिनिधी 

[email protected]