पोळी फ्रँकी

दिंनाक: 21 Jan 2017 14:54:21

साहित्य : पोळीसाठी तेल, मीठ घालून भिजवलेली कणिक; वाफवून जाडसर वाटलेला ताजा वाटाणा; बारीक चिरलेली सिमला मिरची; गाजराचा किस; उकडून कुस्करलेला बटाटा; कोथिंबीर; लिंबाचा रस; तेल फोडणीसाठी; बटर; मिरपूड आणि मीठ.

कृती : प्रथम पॅनमध्ये तेल घालून, ते गरम झाल्यावर त्यात सिमला मिरची, गाजर, वाटाणा घालून परतावे. बटाटा, मीठ, मिरपूड घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावे. नंतर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून भाजी काढून घ्यावी. तयार कणकेची जाडसर पोळी लाटून तव्यावर अर्धवट भाजून घ्यावी. आता या पोळीवर मधोमध उभी भाजीची लाईन घालावी आणि पोळीला डोशासारखे उभे, एक दुसर्‍यावर दोन्ही भाग येतील असे दुमडावे. भाजी बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यावी. आता ही पोळी तव्यावर घालून, बटर पसरवून व्यवस्थित शॅलोफ्राय करावी. पोळी फँ्रकी तयार आहे.

टीप :

* भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत. तिखट घालण्याऐवजी मिरपूड घातल्याने मुलांना वेगळी चव लागेल.

* पोळी फ्रँकी बघूनच मुलांना खाण्याची इच्छा होईल.

- नीशा कोतेवार