खेळाडू : चारपेक्षा अधिक

खेळण्याची जागा : मोकळे मैदान, अंगण, गच्ची

पद्धत : खेळणार्‍या मुलांपैकी कोणीही प्रथम दोन्ही पाय पसरून खाली बसावे. दहा ते बारा फूट लांब इतर मुलांनी रांगेत उभे राहावे. पहिला जो उडी मारतो त्याने बसलेल्या मुलाच्या पायाला स्पर्श करून जायचे, याला काकडी फोडणे असे म्हटले जाते.

काकडी फोडल्यानंतर प्रथम बसलेला मुलगा एक पाय पसरून बसेल. रांगेतील सर्व मुलांनी त्याच्या टाचेवरून उडी मारावी. उडी मारताना जर बसलेल्या मुलाला स्पर्श झाला, तर उडी मारणारा खेळाडू बाद होतो.

एका पायाची उडी झाल्यानंतर दोन्ही पाय पसरून, एकावर एक पाय ठेवून, पायावर एक हात ठेवून उंची वाढवत न्यावी. सर्वांची उडी पायावर एक हात ठेवून, पायावर दोन हात ठेवून उंची वाढवत न्यावी. सर्वांची उडी मारून झाल्यानंतर बसलेला मुलगा दोन्ही हात, दोन्ही गुडघे जमिनीला टेकवून घोडा बनेल. घोड्यावरून उडी झाल्यानंतर घोडा बनलेला मुलगा जमिनीला हात टेकून थोडे गुडघे वरती घेईल. त्यावरून जे उडी मारतील ते विजयी होतील.

कौशल्य : चापल्य, लवचीकता

साभार : भारतीय खेळ

- प्रा. संजय दुधाणे