गोड काला

दिंनाक: 21 Jan 2017 14:55:15

साहित्य : पातळ पोहे, दही, दूध, गूळ, मीठ, काजू, बदाम, खारकेचे तुकडे, सुके खोबरे, खसखस.

कृती : एका वाटीमध्ये पातळ पोहे घ्या. त्यात एक चमचा दही व दूध घाला. त्यात गूळ किसून घाला. दूध खूप घालू नका. पोहे भिजतील इतकेच दूध घाला. त्यात चिमूटभर मीठ घालून किसलेले सुके खोबरे, खसखस, काजू, बदाम, खारकेचे तुकडे घाला.

सर्व जिन्नस एकत्र करून नीट कालवून घ्या. काला करत असताना पोहे फार भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. ते कोरडे राहतील परंतु चावता येतील इतकेच दूध शिंपडून मऊ करावेत.

या खाऊमधून पोषक काय मिळेल?

गूळ - लोह

पोहे - लोह व कर्बोदके

खोबरे, काजू - शरीरास आवश्यक स्निग्धता

दही - कॅल्शियम व प्रथिने

बदाम - तंतूमय पदार्थ

खजूर - लोह