‘पुरुषोत्तम’ च्या धर्तीवर प्राथमिक शाळांच्या गटासाठी नाट्यस्पर्धेच्या आयोजनात उडी घेतली आहे. प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या भालबा केळकर करंडक हि स्पर्धा यक वर्षीपासून ‘नाट्यसंस्कार’ च्या सहकार्याने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित करत आहे.

       महाराष्ट्रीय कलोपासक गेले ५० वर्ष आयोजित करत असलेली पुरुषोत्तम करंडक हि एकांकिका स्पर्धा महाराष्ट्राच्या मानाच्या स्पर्धेपैकी एक आहे. महाराष्ट्रातील नाट्य, चित्रपट सृष्टीतील अनेक लेखक- दिग्दर्शक – अभिनेते व तंत्रज्ञ यांच्या कलाकाकीर्दीची सुरुवात पुरूषोत्तमच्याच रंगमंचावरून झाली आहे. वैविध्यपूर्ण विषयाची हाताळणी, वेगळे दिग्दर्शकीय प्रयोग, उत्कट अभिनय या मंचावर सादर झाले. परंतु, गेले काही वर्षे या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या कालासृष्टीतील दिग्गजांनी यक सादरीकरणात येणारा तोचतोचपणा, विषयांच्या हाताळणीतले अपरिपक्क्वता व केवळ पारीतोषिकासाठी गिमिक्स चा वापर याबद्दल आयोजकांनी व स्पर्धकांनी विचार कारावा असे सुचविले होते.

       स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यासाठीच आयोजाकांनी सतीश आळेकारांसारख्या जेष्ठ लेखक व दिग्दर्शकांचे मार्गदर्शन लाभणारी कार्यशाळा आयोजित केली होती. आणखीनही काही स्पर्धक विद्यार्थी कलाकारांसाठी महाराष्ट्रीय कलोपासक गेले तीन / चार वर्षे सातत्याने करत आहे. याविषयी महाराष्ट्रीय काळातच नाटिकांचा विचार करतात. एक सांघिक कलाकृती म्हणून नाटीकेची तयारी करत असताना विद्यार्थिनी उच्या मुलाशी जाऊन विचार करणे आवश्यक आहे. या दृष्टीने केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून अशी अपेक्षा न करता त्याही आधी शालेय वयात सहजपणे त्यांच्यावर नाट्यविषयक तंत्राचे अभिनयाचे संस्कार झाले तर पुढ्च्या काळात पुरूषोत्तम किव्हा अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी येणाऱ्या कलाकाराची नाट्यविषयक जाणीव अधिक समृद्ध झालेली असेल. कदाचित नाट्य वा चित्रपट करिअर म्हणून विचार करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणालाही याचा उपयोग चांगला होईल.

       म्हणूनच महाराराष्ट्रीय कालोपासकने यावर्षीपासून ‘पुरूषोत्तम’ च्या धर्तीवर प्राथमिक शाळांच्या गटासाठी नट्यास्पर्धेच्या आयोजनात उडी घेतली आहे. प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या भालबा केळकर करंडक स्पर्धा ह्या वर्षी पासून ‘नाट्यसंस्कार’ च्या सहकार्याने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित करत आहे. यक वर्षी तब्बल ३८ संघांनी यात सहभाग घेतला आहे. उक सहभागी संघाच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी लेखन- दिग्दर्शन कार्यशाळा गेण्यात आली. यात जेष्ठ रंगकर्मी प्रसाद वनारसी यांनी मार्गदर्शन केले..