साहित्य : पातळ पोहे, किसलेले गाजर, बीट, मोड आलेले हिरवे मूग, खोबर्‍याचा चव, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कोबी, मुठभर डाळं, चवीप्रमोण मीठ व साखर, लिंबाचा रस, फोडणीचे साहित्य.

कृती : एका वाटीमध्ये पातळ पोहे घ्या. त्यात मोड आलेले हिरवे मूग, किसलेले गाजर, बीट घाला. त्यानंतर ओल्या खोबर्‍याचा चव भरपूर घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कोबी घाला. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून वरून थोडे लिंबू पिळा.

 

छोट्या कढल्यात तेल तापवून त्यात जिरे, हिंग, हिरवी मिरची, डाळं घालून ही फोडणी पोह्यांवर घालवी. त्यांनतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

या खाऊमधून काय पोषक मिळते?

पोहे - लोह

हिरवे मूग - ‘क’ जीवनसत्व

गाजर - ‘अ’ जीवनसत्व

बीट - लोह

डाळं - प्रथिने व कॅल्शिअम

ओले खोबरे - प्रथिने, स्निग्धता

कोथिंबीर - ‘अ’ जीवनसत्व

टोमॅटो - ‘क’ जीवनसत्व

कोबी – कॅल्शिअम

श्रुती देशपांडे