शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण- १९-१-१७

 

पाठ्यपुस्तकासाठी विद्यार्थ्याला बँक खाते उघडण्याचा शिक्षण खात्याचा आदेश टीकेची झोड ठरल्यानंतर, ‘बालभारती’ ची पुस्तके सरकारकडून प्रत्येक्ष दिली जाणार असून, त्या व्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची रक्कम जमा करणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिले.

राज्यातील शालेय विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तकांची रक्कम यापुढे थेट विध्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने काही दिवसापूर्वी घेतला होता. त्यासाठी विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड किव्हा ग्रामीण बँकेत खाते उघडण्याची सूचना करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले होते. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर शिक्षक, मुख्याध्यापकासह, इतर अनेक स्वयंसेवी संघटनांनी टीका केली होती. त्यानंतर बुधवारी या संदर्भात शिक्षणमंत्र्याकडे विचारणा केली असता, यक परिपत्रकाचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले.

तावडे म्हणाले. ‘विध्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तके देण्यात येतात. हि पुस्तके सरकारच छापत असल्याने ती थेट विद्यार्थ्यांना देणार असून, त्यांचे पैसे बँकेच्या खात्यात जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बालभारतीव्यतिरिक्त शिक्षण विभाग अनेक पुस्तके विध्यार्थ्यांना देत असतो. त्या पुस्तकाचे पैसे थेट विध्यार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.’

 

 

‘भविष्यात या निर्णयाचा फायदा होणार असून, कंत्राटदारीबंद करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.’आसे तावाडे यांनी स्पष्ट केले.                                      (सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स )