बाल

बंदिस्त काळ सुटीचा

सुटी लागली की मुलांच्या आनंदाला उधाण येते. शेवटचा पेपर संपला रे संपला की मुलं सुटीत काय करणार हे ठरवायला मोकळी! कुणी मामाच्या गावाला जातात, कुणी थंड हवेच्या ठिकाणी सफर करतात तर कुणी नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्याकडे जातात. पण मुलांनो, यावर्षी हा आनंद गम..

फुलपाखरू

  सुंदर सुंदर फुलाफुलांतून डोकावते ही परी रंगबिरंगी परिधान करूनी सजली कशी बावरी इकडून तिकडे गिरकी मारूनी स्वच्छंद वावरतेऐटीत तोरा पाहा तो नखरा कसा दाखवते फुलाफुलांची राणी जणू नाजुक साजूक फुलराणी ही हवेत भिरभिर उडते पंखावरचे बारीक ठिपके शोभून हो दि..

 मैत्री

कमळाच्या फुलाप्रमाणे मैत्रीच्या नात्यांचेही अनेक पैलू असतात. ते जसजसे उलगडू लागतात तसतसे ते अधिक सुंदर वाटू लागतात आणि मनाला खुलवतात, सुखावतात. जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रत्वाच्या नात्याची महती वेगळीच. मैत्रीचे नाते सहवासातून जुळते आणि फुलते; पण सहवास तु..

आप्पे

  मधुरा म्हणजे अखंड उत्साहाचा झराच, आवड तर सगळ्याच गोष्टींची नट्टापट्टा, नाच, गाणे, उपक्रम, गप्पा मारणे, अभ्यास, सल्ले... सल्लेसुद्धा भन्नाटच मैत्रिणींचे भांडण सोडवण्यात तरबेज अन् वरून पटवून देण्यात मधुबाई एकदम सगळ्यांची बाईच होते बरं!. सगळंच आवडत..

सोनू चा खाऊ

आज सोनू आलीये आपल्या भेटीला, आईसोबत एक रेसिपी घेऊन. तिच्या आवडीचा ढोकळा शिकवणारे ती आपल्याला. सोनूची आई आणि आजी शिक्षिका त्यामुळे सगळं अगदी नियोजनपूर्वक सुरू आहे. चला तर मग माधुरीताई आणि सृष्टी काय बनवतात ते पाहू.ढोकळा बनवण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ (यामध..

आई

आई कशाला उठवतेस लवकर नाही मला शाळा..डोक्यावर हात फिरवून म्हण ना झोप रे अजून बाळा...।।मी ही तसा आळशी नाही.. उठेनच लवकर जरा...दोघे मिळून व्यायाम करू....आवर ना भराभरा...।।रोज व्यायाम करून मला हेल्दी व्हायचंय खूप... जेवणात आज घेइन मी पण बाबांसारखं सूप..।।ना..

शाळेची ओढ

  ही पायाखालची वाट माझ्या शाळेची वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची गुरे लावून पाण्याला हाक मारतो गण्याला गुणगुणत लकेर एक गाण्याची वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची|| नको काळजी पोटाची नको काळजी उद्याची मला गरज हो   मुक्त बालपणाची वाटे ओढ मला शा..

बाप्पा

आई बाबा तुम्ही घरी कसे ? ऑफिस ला तुमच्या सुटी लागली? शाळा आणि आजोळ ही बंद आहे.. बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली कोणी घरातून बाहेर पडत नाही।.. म्हणतात बाहेर जंतू आहे... नक्की प्रॉब्लेम काय असावा?.. मनात माझ्या किंतू आहे खाण्यापिण्याची नुसती चंगळ चालू आहेर..

बडबडगीत मनीमाऊ

    मनीमाऊ मनीमाऊ          छोटे तुझे कान          अंग किती मऊ छान ।।१।। मनीमाऊ मनीमाऊ            असे तुझे क..

झंप्या पहिलवान

  तसं बघितलं तर झंप्या म्हणजे काडीकिडा. फुंकर मारली तर उडून जाईलसा. शाळेतले त्याचे मित्र सतत मस्ती करत असतात पण हा आपला कोपऱ्यात उभा अंगठा चोखत. शाळेचं दप्तर पण पाठीवर झेपत नाही त्याला आणि ते पाठीवर घेतलं की इतका वाकतो की दिसतच नाही कोण चाललंय. सग..

गोट्या

  ओंकार हातपाय धुवून  स्वयंपाकघरात आला, तेव्हा आंबेमोहोर तांदुळाच्या भाताचा सुगंध दरवळत होता. मिरगुंड, काकडीची चटकदार कोशिंबीर, श्रावण घेवड्याची भाजी, केळ्याचं शिकरण, दारातल्या शेवग्याची आमटी. ओंकारला सपाटून भूक लागली होती. आजी पण आग्रहा..

सुट्टी चा आनंद

  शाळा नाही, परीक्षा नाही. पहिले एकदोन दिवस फार भारी वाटलंही असेल, पण आता मात्र अगदी कंटाळा आला असेल ना छोट्या दोस्तांनो? दर वर्षीच्या उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळी सुट्टीपेक्षा जास्त वेगळी मिळालेली ही अवकाळी सुट्टी तुम्हाला फारशी आवडत नसणार, कारण आ..

गुणाढ्याचा आदर्श एकांतवास

आपणा सर्वांना गृहबद्ध होऊन राहणे सध्या भाग आहे. एकांत आपल्या सगळ्यांवर कोसळला आहे. आपण सुदैवाने कुटुंबीयांसोबत आहोत, परंतु समाज, रोजचे मिसळणे हे आपण हरवून बसलो आहोत. या एकांतात आपण कृतिशील राहू शकतो का? काही घडवू शकतो का? याचा विचार केला पाहिजे. असाच आपल्..

इडली...

साहित्य : ३ वाटी तांदूळ, १ वाटी उडीद डाळकृती : तांदूळ आणि डाळ भिजत घातली रात्री वाटून घेतले सकाळी चवीनुसार मीठ घातले इडली पात्रात मिश्रण टाकून २० मि. गैस वर ठेवले.. थोडे गार झाल्यावर काढले.... मग काय आई आणि बाबांन बरोबर बसलो नाष्टा करायला.खूपच मजा आली..

माझी सुट्टी

 भार्गवी ला खूप लहानपणापासून क्राफ्ट ची खूप आवड आहे. सतत कशात तरी गुंतलेली असेल तर ती खूप खुश असते. आम्ही नेहमी काही ना काही तरी करत असतो. सध्याची ही सुट्टी एक निमीत्त झाले. तिने स्वतः च घरातले जूने बॉक्स, सामान गोळा करून रोज एक वस्तु करायची असे ठर..

सॅनिटायजर

साहित्य = थोडी कडुलिंबाची पाने,थोडी तुलशीची पाने, तुरटी,कापुर,1 लिटर पाणी. कृती = पाण्यात कडुलिंबाची पाने,तुलशीची पाने,कापुर4-5,तुरटी 1-2तुकडे घालून न पाणी गॅसवर20-25 मिनिटे उकळून घेऊन थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरावे.        ..

कथेची गोष्ट

सर्वसाधारणपणे कथा म्हणजे गोष्ट असे म्हटले जाते.गोष्ट सांगणे व ऐकणे श्रवणसंस्कार,बोधपर अनुभूती आहे.कथन केली जाते ती कथा.कथा ही श्राव्य तसेच लिखित स्वरूपात असतेच.आजी-आईकडून गोष्ट सांगितली जाते.चिऊ-काऊ, परीकथा,वाघोबा, चल रे भोपळ्या ,चांदोबा मामा,फार फार वर्..

आजीची माया

  अमोल आठवीत शिकत होता. आईबाबा दोघेही कामावर जायचे. तो आणि त्याची आजी असे दोघेच दिवसभर घरी असायचे. आजी दिवसभर बसल्या बसल्या जेवढी जमतील तेवढी कामे करायची. गुडघेदुखीने ती हैराण होती. भाज्या निवडून ठेवा. कपड्यांच्या घड्या करा. जपमाळ ओढा. असं बसल्या..

झुमरूची मदत

एक मोठं जंगल होतं. त्यात वेगवेगळी झाडे, वेली, छोटी-छोटी झुडपं होती. या झाडांवर लाल, पिवळी, निळी, केशरी वेगवेगळ्या रंगांची छान छान फुले होती. त्या फुलांमधला मध गोळा करायला वेगवेगळे कीटक यायचे. त्यात भुंगा, फुलपाखरे, मधमाश्या, मुंगळे या सर्वांची ये-जा असा..

छोटू आणि देवबाप्पा

    एकदा छोटू सरळ देवाकडेच गेलाजग बदलून हवंय अर्ज त्याने केला काय देवा अशा चुका केल्यास कितीसांगायला सगळ्यांना तुझी वाटे भीती एवढ्या गोड आंब्यात हवी कशाला कोय?जाईजुई मोग-याला रंग विसरलास होय? किती सुंदर गुलाब टोचतात मला काटेअबोलिच्या रंगा..

डबल धमॉल

  ‘हिरो..!’, जय आनंदाने ओरडला. ‘ए, राहू दे रे तुझा हिरो! आपण इथे खेळायला आलो आहोत ना?’, नरेन जोरात म्हणाला. पण ओळखीची खूण म्हणून हिरोने जयला शेपटी हलवून दाखवली होती. तो एक तेज डोक्याचा, करड्या रंगाचा कुत्रा होता. आज पतेतीची..

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९, निकाल

    सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९ निकाल – गट क्र. १ पूर्वप्राथमिक विभाग प्रथम क्रमांक – दिपान्विता जोशी – शुभेच्छा वही आणि लिफाफा. द्वितीय क्रमांक – तन्वी गंभीरे – एन.ई.एम.एस. प्री प्रायमरी स्कूल, पुणे &n..

पुढे चला

  साहित्य : १ पत्त्यांचा जोड, २ कागद, २ पेन्सिली. खेळाची तयारी : हा खेळ दोन गटात किंवा कितीही जणात खेळता येतो. घरात खेळताना ‘आई’ आणि ‘बाबा’ असे दोन गट आहेत. आईच्या गटात अन्वय, रोह्न आणि आजी. बाबांच्या गटात सारा, प्रिया आ..

वैविध्यपूर्ण भेटकार्ड

  साहित्य – जाड पांढरा कागद ( शक्यतो गुळगुळीत ), वेगवेगळ्या प्रकारची पाने, फेव्हिकॉल, वॉटर कलर, पोस्टर कलर, भेंडी, सिमला मिरची, कारले वगैरे. आता तुम्हाला भाज्यांचे ठसे कसे करायचे ते माहित आहे. त्याचाच उपयोग करून भेटकार्ड बनवायची आहेत. पान..

बॉल आणि आंधळी कोशिंबीर

  खेळाचे ठिकाण – मैदानावर किंवा आत वयोगट – ७ ते १५ किती जण खेळू शकतात ? – ३ जणांचा एक गट अशा ४ किंवा जास्त जोड्या. खेळ कसा खेळायचा ? – ३ जणांचा १ गट, असे ४ ते ५ किंवा जास्त गट करावेत. प्रथम पहिल्या मुलाचे डोळे कापडाने ब..

बदामी कुपी

  साहित्य - कार्डपेपर वा अन्य कुठलाही जाड कागद, गम, (चित्रकलेचे साहित्य) पेन्सिल, फुटपट्टी, स्केचपेन इ. कृती - तुम्ही घेतलेल्या जाड कागदावर साधारण हा मावेल अशी डबी बनवायची असल्यास दिलेल्या मापाने आकृती काढून घ्या.पूर्ण आकृतीत दाखवल्याप्रमाणे दु..

टोचाटोची

  साहित्य :६ फुगे. ३ बॉलपॉइंट पेन.३ पेन्सिली.खेळायची तयारी :हा खेळ किमान दोन आणि जास्तीत जास्त कितीही जणांत खेळता येईल. आता तिघं जणं हा खेळ खेळत आहेत. हा खेळ खेळण्याआधी घरातला पंखा आणि खिडकी बंद करा. टेबलावर १ बॉलपॉइंट पेन आणि त्याच्या बाजूला..

राणीचा किल्ला

  मैदानी खेळ वयोगट – ६ वर्षांवरील मुले किती जण खेळू शकतात – कमीत कमी १० मुले, जास्तीत जास्त ३० मुले खेळाची रचना – १ छोटा गोल मध्यावर, त्यावर काही मुले उभी राहतील, १ मोठा गोल, त्यावर जास्त मुले उभी राहतील. साहित्य – गोल ..

फुगा फोडी

  साहित्य : १० फुगे.खेळायची तयारी : हा खेळ किमान दोन आणि जास्तीत जास्त कितीही जणांत खेळता येईल. हा खेळ अन्वय आणि सारा खेळत आहेत, असं समजू या. दोघांना ५-५ फुगे द्या.चला खेळू या :प्रथम सारा एक फुगा फुगवेल व अन्वयला देईल. अन्वयने फुगा हातात घेताच सार..

राम-रावण

  खेळ प्रकार : मैदानी खेळ वयोगट : ७ ते १४ वर्षे कितीजण खेळ शकतात : कमीत कमी १० मुले किंवा जास्तीत जास्त कितीही. रचना : मैदानावर मध्यभागी एक रेघ आखणे त्या रेषेपासून सारख्याच अंतरावर दोन्ही बाजूंस दोन रेघा आखणे व दोन गट पाडून मुलांना ओळीत उभे करणे. साहित्य : रेघा आखण्यासाठी फक्की खेळ कसा खेळायचा : मैदानाच्या मध्यभागी रेषा आखावी. तेथे रेषेच्या दोन बाजूंस दोन गट उभे करावे. एक गट ‘राम’ व दुसरा ‘रावण’ बनेल. खेळ घेणार्‍यांनी रा रा रा रा असे म्हणत कधी राम तर कधी रावण ..

गरगरे कुटुंबीय

  सिलींग फॅन : खरं म्हणजे, या गरगरे कुटुंबातला मी सिनियर सिटिझन. पण... एक्झॉस्ट फॅन : आता काय झालं आजोबा? सिलींग फॅन : ए, तुला दोन ब्लेड जास्ती आहेत म्हणून उगाच चोंबडेपणा करू नकोस. टेबलावर बसलेल्या माझ्या धाकट्या भावाशी मी बोलतोय. सिलींग फॅन : ..

ओळख लोककलेची

  राघव, मामाच्या गावाला बर्‍याचं वर्षानंतर आला होता. आधी आला होता तेव्हा तो बराच लहान होता. आता तो सातवीला गेला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कुतुहल वृत्तीने बघण्याची सवयही वाढली होती. राघवच्या मामाचं गावं तसं शहरापासून थोडसं दूरचं होतं. खेडं..

सुट्टीची ओढ

  आज शाळेचा शेवटचा दिवस असल्याने वर्गात मजा आणि मस्तीच वातवरण होतं. त्यात बाई मुलांना उन्हाळ्याच्या सुटीत काय काय धम्माल, मस्ती करणार हे एक-एकला विचारत होत्या. मुलांच्या भन्नाट कल्पना ऐकून त्यांना हसू ही येत होत आणि आश्चर्यही वाटत होतं. सनी मात्र..

मामाच्या गावाला जाऊ या

झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहू या... मामाच्या गावाला जाऊ या... जाऊ या.. मामाच्या गावाला जाऊ या... हे गाणे ऐकताच मला माझ्या मामाच्या गावाची आठवण येेते. माझ्या मामाच्या गावाचे नाव ‘शेवगाव’ आहे. दर वर्षी म..

हिरवं हृदय

  परवा नातीला भेटायला गेले.  गेल्याबरोबर  आज्जी ऽऽऽ म्हणून गळ्यात पडणारी नात टीव्हीवर नजर लावून बसलेली! मी माझ्या लेकीला विचारलं आज काय झालं परीला? इतकी कधी गुंतून पडत नाही टीव्हीवरच्या कार्यक्रमात! नेहा, नको बाई सवय लावू तिला टीव्ही बघण..

सुर्यमालेबाहेरील अवकाश झेप

  मित्रांनो, मागील लेखात आतापर्यंत आपण, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीत युद्धाच्या दरम्यान सुरू झालेली अवकाश स्पर्धा आणि चंद्रावरील मानवाचे शेवटचे पाऊल म्हणजेच अपोलो 17 ही मोहीम इथवर अवकाश स्पर्धेचा इतिहास पहिला. हीच अवकाश स्पर्धा पुढे ..

सुट्टी

  कंटाळवाणी बोअरिंग सॉलेड एक्झाम एकदा संपली म्हटलं आता धमाल करू सुट्टी सुरू आपली। आईस्क्रीम, गार्डन, गेम्स आणि भरपूर सार्‍या मूव्ही दिवसभर फक्त बघणार आपण आता टी.व्ही. मनात सारं ठरवून म्हटलं ... यार चंगळ आहे आपली। कार्टून नेटवर्क, क्रि..

स्वप्न

  एकदा काय झाले स्वप्नी आले आभाळ हसून मला म्हणाले चल माझ्यासंगे बाळ   खुशीतच म्हणाले पण मी कसं येऊ? आभाळ मग म्हणाले पाठवतो ढगभाऊ   त्याने धाडला ढग मला सोबत म्हणून आईला न सांगता बसले त्याला धरून!   ढग मला म्हणाला गा त..

गोष्ट मिहीरची व रोहनची

  मिहीर, त्याची आई व बाबा, त्रिकोणी कुटुंब. बाबा सोफ्टवेअर कंपनीत इंजिनियर तर आई बँकेत. उच्च मध्यमवर्गीय सुखी त्रिकोणी कुटुंब! पण आख्ख्या बिल्डींगमध्ये भांडकुदळ कुटुंब म्हणून ओळखले जाणारे. त्या दिवशी रात्रीची वेळ. एकदम जोरात किंचाळण्याचा आवाज आला..

ओळखा पाहू मी कोण ?

पूर्व-प्राथमिकच्या पालकांना आपल्या मुलांसोबत खेळता येईल असं सहज आणि सोपा खेळ !!!   उत्तर कमेंटबॉक्समध्ये द्या....

डोंगराचे स्वप्न

  एक डोंगर स्वप्न पाही सागराच्या भेटीचे! पहिले पाऊल खडकामधून जिद्दीच्या थेंबांचे! थेंब थेंब वाहत राही अवघड वाट शोधताना कधी काटे... कधी दरी... कधी दमे... चालताना थांबत नसे तरीही तो वेग येता स्वप्नाला कळत नसे ओहोळ होऊन भेटलो कधी नदीला नद..

ओळखा पाहू

पूर्व प्राथमिकच्या पालकांना आपल्या मुलांसोबत खेळता येईल असा सहज आणि सोपा खेळ!!! उत्तरे कमेंटबॉक्समध्ये द्या...

गणिताचे आकडे

गणिताचे आकडे  एकदा झाले वाकडे एकला फुटले डोके दोन म्हणाला ओ.के. तीनचा वेगळा थाट चारच्या पोटात गाठ पाचला फुटलाय पाय सहाला उंचीच नाय सातची कुबडी पाठ  आठचा आडवा घाट नऊचा डोळा डोक्यावर दहाचा सर्वांवर जोर - पार्थ प्रशांत डुड्डू 7वी, निलगिरी..

मांजराची बर्थडे पार्टी

माझी एक मांजर, तिचे नाव किटी तिच्या बर्थडेची  केली आम्ही पार्टी काऊ आला, चिऊ आली आला होता मिठू त्या सगळ्यांना आम्ही गोड खाऊ वाटू. आता आली गाय. तिचं गिफ्ट काय? तिने दिली किटीला दूधावरची साय. नाचत नाचत मोर आला, त्याने उंदीर गिफ्ट दिला. म्हणाला,‘गिफ्ट खास, खाऊन टाक त्यास.’ नंतर आले बदक भाऊ त्यांनी आणला गोड खाऊ ते म्हणाले किटीला, ‘खाऊन टाक नको भिऊ.’ मग आले कबुतर त्याचे गिफ्ट पहा तर ते म्हणाले किटीला, ‘तुझ्यासाठी छान पर्स.’ आता आली किटीची ..

ओळखा पाहू मी कोण ?

पूर्व प्राथमिकच्या पालकांना आपल्या मुलांसोबत खेळता येईल असा सहज आणि सोपा खेळ   ..

एक होतं

एक होतं प्रश्‍नचिन्ह त्याने चष्मा लावला, तरीसुद्धा उत्तराचा पत्ता नाही गावला!   एक होतं माकड  ते पुस्तक वाचून उठलं माणूस आपला पूर्वज हे त्याला नक्की पटलं!   एक होतं वांगं ते होतं उपास करीत त्याने चक्क उपासाला  खाल्लं आपलंच भरीत!   - अभय मनोहर कदम म.ए.सो. मुलांचे हायस्कूल..

फजिती

  एक होता ससा आणि एक होता मासा ससा पडला पाण्यात आणि मासा हरवला जंगलात ससा गटांगळ्या खाऊ लागला मासा घाबरा-घुबरा झाला ससा म्हणाला अरे बापरे हाव दुसर्‍याची नको रे मासा घाबरला खूप कशाला हवे दुसरे रूप उगीच केला सशाचा हेवा मला परत पाण्यात ठ..

भेळ घ्या भेळ

  “मग मी एवढं केलं, तर तू मला संध्याकाळी घेऊन जाशील?’’ छोट्याशा ‘बंबू’ने सवाल केला.  “अगं, पण मी घरी करते ना!” “नाही मला तिथलीच हवी!’’  “बरं बाई, नेईन.” आ..

मुंगी

  एकदा एक मुंगी मोठ्यांदा हसली गंमत म्हणून स्वतःलाच डसली मुंगीच्या नाकावर आला मोठा फोड चाटून पाहिला तिने तर लागला की गोड! अचानक अंग मग पडलं तिचं जड बरणीतल्या बरणीतही चालता येईना मुंगीला बघता बघता मुंगीचं वाढलं की वजन जागेवरच बसल्या बसल..

उंटीणबाईंची शाळा

  प्राण्यांच्या शाळेत उंटीणबाई आल्या तरातरा खडू घेऊन फळ्याकडे गेल्या॥   फळा होता सपाट छान काळा काळा अक्षर लिहिले वळणदार मोत्यांच्या माळा॥    पटपट लिहून घेणारी हुशार पोरे होती बाई बघती वह्या आणि सह्या करून देती॥   इ..

कला आणि करिअर रिऍलिटी

  भव्य दिव्य रंगमंचावर, दोन तीन गुरु व एक महागुरू विशेष पाहुण्यांना बोलावतात. आता निकाल जाहीर करू या का? अशी मोठ्या अदबीने त्यांची परवानगी घेतात. एक बंद लिफाफा पाहुण्यांच्या हातात सोपवला जातो. जुन्या काळी पोस्टमन तार घेऊन आल्यावर जसे वातावरण ताणलेल..

मोटू पतलूची फ्रेंडशिप

छोटा डॉन फुरफुरी नगरीमध्ये चोरी करून जंगलात जाऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर चिंगमने मोटू आणि पतलूला जंगलात पाठवलं. दोघंही खूप उत्साहाने जंगलात जायला निघाले. जाताना त्यांनी खूप खायला वगैरे घेतले. ..

गोपाळकाला

श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. या दिवशी मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. भारतीय संस्कृतीने आणि धर्माने मानलेल्या भगवंताच्या दशावतांरापैकी श्रीकृष्ण हा आठवा अवतार होय. म्हणूनच या दिवशी रात्री बारा वाजता कीर्तन-भजनाने हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो...

अंकलेखन व अक्षरलेखन

लहान मुलांना सुरुवातीपासूनच अक्षरांचे योग्य वळण समजले तर ते अंक व अक्षर सुंदर आणि योग्य पद्धतीने काढू शकतील; यासाठी शिक्षक फळ्याच्या साहाय्याने पाटीवर अक्षरे, अंक काढून घेतात. ते ज्या क्रमाने अक्षरे, अंक पूर्ण करतात, ते बारकाईने पाहून त्यात दुरुस्ती करणे ..

भाजीचा यक्षप्रश्न

संध्याकाळ झाली की, सुनीताच्या पुढे भाजी काय करायची? हा यक्षप्रश्न उभा राहत असे. तिची मुलगी केया लहान असेपर्यंत तिला हा प्रश्न कधीच पडत नव्हता. केयासाठी वरण-भाताचा कुकर व कधी केयाच्या बाबांच्या, तर कधी स्वत:च्या आवडीची भाजी केली की, तिचे काम होऊन जात असे..

माझी तुलना माझ्याशीच

‘‘आई, माझ्या चित्राला पहिला नंबर मिळाला.’’, अन्वी ओरडत एखाद्या वादळासारखी घरात शिरली. तिच्या आवाजाने अर्णव दचकला. ‘‘अन्वी किती जोरात ओरडतेस, तो घाबरला ना.’’ ‘‘ते जाऊ दे, हे बघ बक्षीस.’&rs..

रविवार

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही अजून एक सुंदर, बाल-मनात डोकावणारी कविता.  लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही रविवार हवाहवासा वाटतो. हा छोटा मुलगा किती आतुरतेने रविवारची वाट पाहत असतो. रविवार म्हणजे जणू त्याचा दोस्तच. पण सोम, मंगळ, ब..

स्नेहसंमेलन एक आनंदोत्सव

जूनपासून शालेय वर्ष सुरू होते आणि एक एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता करता दिवाळीच्या सुट्टीनंतर वेध लागतात ते एका मोठ्या सांस्कृतिक सोहळ्याचे, म्हणजेच  वार्षिक स्नेहसंमेलनाचे. स्नेहसंमेलन म्हणजे मुलांच्या विविध गुणदर्शनाचा सोहळा. एका दिवसाच्..

पुस्तकात रमताना...

उडाणपूर नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात दिनूआबा नावाचे शेतकरी गृहस्थ राहत होते. दिनूआबा शेतकरी असले तरी साऱ्या कामात पारंगत होते, पण लहानपणी अभ्यास केला नाही, शिकलो नाही याची खंत सतत त्यांना बोचत असायची. आणि म्हणून आपली मुलगी शिकेल, मोठी अधिकारी होईल असं त्यांच स्वप्न होतं. त्यांच्या मुलीचं नाव होतं पारू. पारू ही खूप गोड आणि तितकीच हुशार मुलगी. आपल्या बाबांना काय आवडतं तिला अचूक कळायचं. त्यांचं स्वप्न पूर्ण करावं असं तिला नेहमी वाटायचं आणि म्हणून पारू मन लावून अभ्यास करायची. ..

मुलांचे भावविश्‍व उलगडणारा बालसाहित्यिक 

  मित्रांनो, बालदिनानिमित्त सुरू केलेल्या ‘ओळख बालसाहित्यिकांची’ या सप्ताहातील शेवटच्या लेखात जाणून घेऊयात ज्येष्ठ साहित्यिक ल.म. कडू यांच्याविषयी... आपल्या लेखन आणि चित्रकलेच्या माध्यमातून चिमुकल्यांचे भावविश्‍वाचे..

सुपरहिरो

“अशा आयडिया येतात कुठून रे बाईंना एकदम मॅड...”, इतक्यात मला समोर बघून आराध्य थबकला. तितक्याच शिताफीने वाक्य बदलून तो म्हणाला “माईंड ब्लोईंग आहेत बाई. अरे काकू आल्या. चला.”मुलांना शाळेतून आणायला जायला मला दहा मिनिटे उशीरच झाला होता...

खजिना बालसाहित्याचा

मुलांना लहानपणीच पुस्तकं वाचून दाखवावी या विषयावर आम्हा मैत्रिणींची चर्चा व्हायची. त्यातल्या एका खास मैत्रिणीने तिच्या मुलासाठी ७-८ वर्षांपूर्वी घेतलेली 'राधाचं घर ' मालिकेतली सगळी पुस्तकं उर्वी साधारण दीड वर्षांची असताना आणून दिली. त्या पुस्तका..

सहजी रमावे राजीव साहित्यात...

“त्या दिवशी मला समजलं, ज्यांना मुलांपेक्षा चांगल्या साड्या आवडतात. अशा बायका मुलांची तेल लावून चंपी करतात!!! त्यांना ती मुलं चंपी काकू म्हणतात.” आणि ज्यांना चांगल्या साड्यांपेक्षा सुद्धा तेलकट, तुपकट मुलं आवडतात. अशा मुलांना त्या बायका मायेन..

यारे या सारे गाऊ या

“या रे या सारे गाऊ या” असे म्हणत आपल्या लडिवाळ कवितांमधून मुलांना आवाहन करणारी ही कवयित्री आहे, डॉ. संगीता बर्वे. संगीताताई या आयुर्वेदाच्या डॉक्टर. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. ही पदवी घेतल्यावर त्यांनी ‘आयुर्वेदिक डाय..

जाणीवा बळकट करणारं बालसाहित्य

बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमी म्हणतो. या काळात झालेले संस्कार हे पुढे आपलं भविष्य घडवत असतात. एकनाथ आव्हाड यांच्या आईंनी पुस्तकी शिक्षण घेतलेलं नसलं तरी कीर्तन-प्रवचन ऐकायची त्यांना सवय होती. आईबरोबर राहून राहून आव्हाड सरांनाही ते आवडू लागलं. कीर्तनातील निरुपण, रंगवून रंगवून सांगण्याची पद्धत याची गोडी लागली व तेच पुढे मनात रुजलं. "आईने आम्हाला अनावश्यक खर्चासाठी पैसे दिले नसले तरी पुस्तकं विकत घ्यायला मात्र ती पैसे द्यायची.", असं ते आवर्जून सांगतात.   हाय मित्रांनो! कसे आहात? दिवाळी ..

दृष्टीकोन : बघण्याचा-ऐकण्याचा-अनुभवण्याचा !

लहान मुलांना गाणी शिकवणे हा त्यांचे ऐकण्याची क्षमता वाढवण्याचाच एक भाग आहे. गाण्याची चाल आणि त्यातील यमक यामुळे मुलांची फक्त आकलनशक्तीच नाही, तर कल्पनाशक्तीदेखील वाढते. त्यांचे उच्चार सुधारतात व दोन शब्दांमधील फरक त्यांना पटकन कळू लागतो. संस्कृत श्लोक ऐकणे व पाठांतर करणे याचादेखील ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होतो...

बालवयाला शोभणारी गाणी - भाग ३ 

  हे नमन शारदेस माझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, गणपती बाप्पा आल्यावर तुम्ही खूप धम्माल केली ना? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते. सगळ्यांनी मिळून झांजा वाजवून बाप्पाची आरती करायची अन् रोज छान छान प्रसाद खायचा. जेवणातही रो..

लहान मुलांनी नाटक का पाहावं?

लहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यां..

कविता-बाप्पा बाप्पा

पिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला गालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला बाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर जय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर' उंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर  चहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर' ..

पाया रचताना......

पाया रचताना  पहिलीचा वर्ग हा बालकांच्या शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे, कारण तिथूनच त्याच्या औपचारिक शिक्षणाचा पाया घातला जातो. हा पाया जितका मजबूत, तितकी इमारत अधिक भक्कम बनते यात शंका नाही. अन्यथा गैरहजरी, गळती, अप्रगत, शाळाबाह्..

बालवयाला शोभणारी गाणी - भाग २

माझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, पाऊस कोणाकोणाला आवडतो बरं. मला वाटतं तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असणार. फक्त पाऊस आवडण्याची कारणं वेगवेगळी असतील. तुम्हाला माहिती आहे कां, आपल्यासारखाच तो प्राणी - पक्षांनाही खूप आवडतो. मोर तर नुसते आकाशात जमू लागलेल..

आपण सारे भाऊ भाऊ

बिबट्या आणि तरस  फार फार वर्षांपूर्वी एका खूप मोठ्या जंगलात घडलेली ही गोष्ट. हे जंगल पाना–फुलांनी, वृक्ष-लतांनी, प्राण्या–पक्ष्यांनी बहरलेले होते. येथे कोणालाही कशाचीच कमतरता नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे या भागाला मानवाचा पायही लागला..

चला नकाशा वाचू या!

जगाचा नकाशा  नकाशा  भूगोल या विषयाचा प्राण आहे, तो समजून घेतला तर आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल, त्यामुळे या लेखात नकाशा म्हणजे काय? भूगोल या विषयातलं त्याच महत्त्व काय ते समजून घेऊ.  नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदाव..

बालवयाला शोभणारी गाणी

मोठ्यांची गाणी लहान मुलांनी म्हणण्यापेक्षा छोट्यांचीच गाणी म्हटली तर ती त्यांना समजतातही आणि ऐकायलाही छान वाटतात. अशी काही गाणी या आणि पुढच्या मधुवंती पेठे यांच्या लेखात बाल गटासाठी देत आहोत...

खगोलाची तोंडओळख

माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र समजावं यासाठीच खगोल शास्त्र समजावून सांगणारं एक नवं सदर आजपासून सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नक्की आवडेल. पालक आणि शिक्षकांनीही वाचलं, तर मुलांना समजावून देताना याचा नक्की उपयोग होईल. ..

आहारगाथा - वय ३ ते ७ (लेख क्र. ३)

मुलांना डब्यात काय काय देता येईल बरं ? उत्सुकतेने लुकलुकणारे डोळे आणि त्यात सामावलेल्या अनेक भावना.... कधी अश्रू तर कधी भीती, कधी आनंद तर कधी शंका, आई-बाबा असे का वागतात? मला शाळेत का जावं लागतं? याचा थांगपत्ता नसणारं बालमन. असे बरेच दिवस जातात मूल श..

कृषी सप्ताह - लेख ४ : निसर्ग सखा 

लेखिका मैत्रेयी केळकर यांनी  शेतीच केली आहे आपल्या गच्चीत. किती सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात. त्या प्रत्यक्ष करून मगच सांगत आहेत आपल्याला. ..

नदीची सफर

एक सफर नदीची. वाचून छान वाटते. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला शिक्षणविवेक आयोजित 'एक सफर नदीची' या उपक्रमातून.विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणविवेक टीम अशा २६८ जणांनी दि.२४ जूनला सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत मुठा नदीची सफर केली. नेहमी आपण पाहत असलेल्या नदीक..

मुलांची हस्तकौशल्ये 

एक छोटीशी चित्रकृती ४+ वयोगटासाठी . मुलांना करून पाहूद्या. पालकांचे काम प्रिंट काढून देणे आणि पुढील निरीक्षण करणे. ..

घडण पालकत्वाची : पेरणी नैतिकतेची

‘नैतिकता’ म्हटलं तर खूप अवघड संकल्पना पण रोजच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाशी जोडलेली. मुलांच्या नैतिक विकासाबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पालक कार्यशाळेत नेहमी चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे “मुलांचा नैतिक विकास आम्ही करू तरी कसा?” त्यादृष्टीने ह्या लेखाद्वारे केलेला हा एक प्रयत्न. ..

पालकत्व

कुटुंब म्हणून मुलांना आपण निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलं तर .... वाचा पालक म्हणून असणाऱ्या आपल्या समस्यांसाठी . ..

नाटिका - संगीताची जादू

गायिका मधुवंती पेठे यांनी स्वतः जपानी भाषा शिकत असताना शास्त्रीय संगीताबद्दलची जाण देणारी एक छोटीशी एकांकिका जपानी भाषेत लिहिली. इंडो जापनीज कल्चरल असोसिएशन तर्फे ती सादरही केली. ..

English भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री!

  कोणतीही भाषा ही महत्त्वाच्या चार कौशल्यांसह आत्मसात केली जाते. ही language skills म्हणजे – Listening, speaking, reading, writing आणि नंतर conversation (dialogue) मातृभाषा शिकताना ही कौशल्य आपल्याला मुद्दाम शिकावी लागत नाहीत, तर ती आजूबाजूच्..

कोणताही पाढा पटकन तयार...

विद्यार्थ्यांनो, सोप्या पद्धतीने पाढ्यांची उजळणी घ्यायला आलीये एक मावशी. तिच्याबरोबर पाढे शिका. ..

मी काय शिकू ? ( बालगटासाठी )

माझ्या छोट्या दोस्तांनो  आणि मोठ्या मित्र-मैत्रिणींनो ( पालकांनो )       आपल्या लहान मुलांना संगीताची गोडी कशी लावता येईल याबाबतीत मी आधीच्या लेखांमध्ये सांगितलं.  साधारणत: २ ते ५ वयोगटातील मुलं खूप चळवळी, सतत का..

घडण पालकत्वाची : भावनांची बैठक 

भावनिक कंगोरे  रमा : आई, आपण रोज एक नवा खेळ आणू या.  आई :  का गं ?  रमा : अगं मला तेच तेच खेळ खेळून कंटाळा येतो.  आई : नवीन खेळ आणले तर काय होईल?  रमा : मग खूप मज्जा येईल, मला बोअर होणार नाही.    चार ..

तान्ह्या बाळांसाठी योगनिद्रा – भाग २

    योग निद्रा  मागील भागात आपण योगनिद्रा, तिचं स्वरूप, विद्यार्थ्यांसाठी तिची उपयुक्तता, संशोधन याविषयी मनोरंजक माहिती बघितली. या भागापासून आपण ही योगनिद्रा वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना प्रत्यक्षपणे कशी देता येईल हे पाह..

व्यक्ती-अभिव्यक्ती

  अभिव्यक्ती  अभिव्यक्ती. व्यक्त होणं ही माणसाची मूलभूत गरज. ते व्यक्त होताना प्रत्येकाचं माध्यम मात्र वेगळं असतं. लहानपणापासूनच आपल्याला भावना कशा व्यक्त करायच्या हे समजलं, भावभावनांना आपण योग्य दिशेने वाट करून देऊ शकलो, तर पुढे जाऊन तणावाचं व्यवस्थापनही  आपण योग्य पद्धतीने करू शकू. या उद्देशाने ५ - ६ वयोगटासाठी शिक्षणविवेकने   'अभिव्यक्ती' हे अभिनव उन्हाळी शिबिरे घेण्यात आली.    'शिक्षणविवेक ' हे शालेय विद्यार्थ्यांसाठी ..

भारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे

हिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं. हिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी  झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मविश्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती.   अलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं  ..

निबंध पाहावा लिहून!

  थोडक्यात सारांश आलेला निबंध म्हणजे चांगला निबंध का ? मित्रमैत्रिणींनो, इयत्ता कोणतीही असो भाषा विषयात तुम्हाला निबंध लिहावेच लागतात. अगदी लहानपणी ५ ओळींचे ते मोठे झाल्यावर २५ ओळींचे. हे लेखनकाम काहींना आनंददायी वाटतं, तर काहींना कंटाळवा..

सुटी सप्ताह : ६ पिंगा आणि धांगडधिंगा

मजा. मस्ती. धमाल. हुर्रे हुर्रे... सुट्टीच सुट्टी. मजा. मस्ती. धमाल. दोन महिने फक्त आपले. आईबरोबर, ताई-दादा आणि बाबाबरोबर नुसतं खेळायचं. काय धमाल येते माहितीय का? मी, आई-बाबा आणि ताई-दादा खेळताना इतकी मजा करतो, की काही विचारू नका. कसलीच बंधन नाह..

सुटी सप्ताह: ३. घरचा समर कॅम्प

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला रे झाला की, बच्चे कंपनीचे निस्तेज झालेले चेहरे आनंदाने फुलू लागतात आणि बच्चेकंपनीसह संपूर्ण घराला सुट्टीचे वेध लागतात. बच्चेकंपनी एकीकडे आता सुट्टीत काय काय धमाल करायची याचे नियोजन करण्यात दंग होते, तर दुसरीकडे मुलांना स..

सुट्टी सप्ताह: २.सुट्टीचा सदुपयोग

सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते. मुलांना समजावून घ्यायला आणि विविध गोष्टी दाखवायला हा कालावधी उत्तम असतो. ..