ब्लॉग्ज

तानपुरा

भारतीय संगीतात तानपुरा (तंबोरा किंवा तानपुरी) हे स्वराचे एक मूळ वाद्य आहे..

तबला

इ.स.पूर्व २०० मध्ये भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात कोरले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे ..

शंकासूर

सोळाव्या शतकाच्या ‘आन्द्रे सिसालपिनी’ या शास्त्रज्ञाचे नाव याला दिले. पल्येरिया म्हणजे अतिशय सुंदर. ३ ते ५ मीटर वाढणारा हा झुडपासारखा वृक्ष सुंदर दिसतोच पण कुठल्याही जमिनीत अगदी क्षार असलेल्या जमिनीत, पाणी कमी असलं तरीही वाढणारा वर्षभर फुलं देणारा हा शंकासूर. ..

कळलावी

कळलावी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ती बहुवर्षीय, वेलवार्गातील आहे. कळलावी ही वनस्पती प्रसूतीसाठी कळा आणण्याचे काम करते. हीचे शास्त्रीय नाव ग्लॉरीओसा सुपर्णा. पहिलं सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्णा. ..

निशिगंध (रजनीगंधा)

निशिगंध हे कंदवर्गीय झाड. रात्रीच्या वेळी या फुलांचा सुगंध दरवळतो म्हणून हे नाव त्यांना पडले आहे. याच्या सात पाकळ्या असतात. याची पाने गडद हिरवी, लांब, अरुंद गवतासारखी असतात. ..

अबोली

गुलाब, मोगरा, शेवंतीबरोबर त्यांच्यात सामावलेली ही अबोली. ही भारतीय वंशाची एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. क्रोसेन्ड्रा इनफंडी बुली फॉर्मीस हे तिच शास्त्रीय नाव. सुमारे ६० से.मी. उंची असणारी, कमी पाण्यात वाढणारी आणि रेताड सोडली, तर इतर कोणत्याही प्रकारच्या मातीत सहज वाढते. अबोलीला वर्षभर फुले येतात. ..

शोधू नवे रस्ते - भाग ५

तुम्ही शाळेत इतिहास शिकत असाल, तेव्हा भारताचे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जगातल्या वेगवेगळ्या भागांशी व्यापारी संबंध कसे होते हे शिकत असाल...

शेवंती

शेवंतीची पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली साधारण केसाळ असतात. हंगाम हिवाळ्यात असतो. फुले कडू, भूक वाढवणारी. सौम्य रेचक म्हणूनही याचा वापर होतो. चीनमध्येही पानांचा वापर होतो. फुलांचे विविध रंग त्यातील कॅरोटिनॉइडांमुळे येतात. बियांपासून तेल मिळते. या फुलात कीटकनाशकाचा गुण आहे...

सदाफुली

बारमाही फुले देणारे अतिशय काटक, शोभिवंत असे हे सदाफुलीचे झाड. याला तीनही ऋतूत फुले येतात. पण जास्त पावसाळ्यात. याचे शास्त्रीय नाव केथारेन्थस रोजस आहे. हे झुडूप वर्गातले असून अनेक वर्षेही जगणारे औषधी झाड आहे...

पावसाळ्यातील भटकंती

जंगलाचा अनुभव घ्यावा; तर तो पावसाळ्यात घ्यावा, असं म्हणतात. आणि तो योग्यच आहे. ताम्हिणीचे जंगल अशा पावसाळ्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे. तिथे अनेक देवराया आहेत. त्यात असंख्य प्रकारच्या भारतीय वनस्पती आहेत. तसेच, विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे आहेत. ताम्हिणी घाटातील जंगलसमृद्धी बघून आपले मन अगदी प्रफुल्लित होते...

शोधू नवे रस्ते - भाग ४

काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला दिल्लीतल्या प्राणी आणि पक्षांबद्दल सांगितलं होतं. थोडा विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे पक्षी इथे का दिसत असतील? ह्या पक्षांना इथे राहण्यासाठी,घरटी बांधण्यासाठी खूप झाडं आहेत. ..

लिली

लिली हे एक आकर्षक, नाजूक फूल आहे. हे महत्त्वाचे व्यापारी फूल असून हारासाठी या फुलांना खूप मागणी आहे. त्यांची मुंबई, पुणे, नाशिक येथे लागवड केली जाते. हे कंदवर्गीय फूल असून त्याची लागवड सोपी, कमी खर्चाची आहे. लीलीत दोन मुख्य प्रकार असून आता संकरीत तिस..

चाफा - भाग २

चाफा - भाग १ या मागील लेखात आपण चाफा या फुलाचे काही प्रकार पहिले. या लेखात चाफ्याचे आणखी काही प्रकार पाहू.  १. देवचाफा – याला पांढरी फुले असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी असून त्यालाच पारंब्या असतात. ही फुले देवाला वाहतात,..

चाफा - भाग १

सुगंधी फुले देणारा तीही झुपकेदारपणे फुले देणारा चाफा. प्रत्येक फूल वेगवेगळे आणि त्यांचा सुगंधही भिन्नच असतो. त्यांचे प्रकारही आठ - नऊ आहेत...

पारिजात

पारिजात - याचे फुल ओरिएसी सुमारे १० मी.पर्यंत उंचीच्या या चिवट मोठ्या झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूळस्थान ‘भारत’ असून छोटा नागपूर, राजस्थान, मध्य प्रदेश; तसेच दक्षिणेस गोदावरीपर्यंत त्याचा प्रसार आहे. खानदेशातही रूक्ष जंगलातही तो आढळतो. पण ..

उन्हाळ्यातील भटकंती : गड आणि किल्ले

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल! कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो! ..

उन्हाळ्याला सामोरे जाताना...

उन्हाळ्यात पाण्याची करमतरता भासते. तहान लागल्यावर मिळेल ते पाणी पिण्याची शक्यता असते. त्यातून जंतुसंसर्ग होऊन उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो इत्यादी आजार होऊ शकतात. अशा वेळी साखर, मीठ, पाणी, लिंबू यांचे मिश्रण मुलांना पाजावे...

कर्दळ

रंगांची विविधता हे कर्दळीचे वैशिष्ट्य आहे. शिवाय कर्दळी सांडपाण्यावर चांगली वाढतात. त्याला काही अपाय होत नाही. हा तिचा विशेष गुण. तिच्यामुळे सांडपाण्यातील काही घटक वेगळे केले जातात. त्यानंतर ते पाणी अन्य झाडांना घालता येते. यामुळेच पूर्वी परसदारी कर्दळीची लागवड हमखास असायची...

एका जगा वेगळ्या पालक–पित्याची कहाणी

छत्तीसगडचं कोटमी सोनार गाव. तेथे मोठं मगरींच पार्क आहे. ते बघायला अनेक लोक येत असतात. असेच एकदा बरेच पर्यटक आले होते. तेवढ्यात अचानक एक व्यक्ती मगरींच पार्क असलेल्या तळ्याकाठी येते. ती व्यक्ती तोंडातून काही वेगळाच आवाज काढू लागते आणि काय आश्चर्य! त..

तेरडा

तेरड्याचे शास्त्रीय नाव ‘इंपेटिएन्स बाल्समिना’ आणि याचे कुल ‘बाल्सामिनेशी’ आहे. ती उंच, गुळगुळीत, काहीशी लवदार, मांसल खोडाची, थोड्या व आखूड फांद्यांची ही औषधी वनस्पती आहे...

शोधू नवे रस्ते..

बालमित्रानो दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या शहराबद्दलच्या गमतीजमती तुम्हाला वाचायला आवडतील का? तुमच्यापैकी काहीजणांनी दिल्ली पाहिली असेल त्यांना या गोष्टी कदाचित माहिती असतील. पण ज्यांनी दिल्ली पाहिलेली नाही त्या..

कागद वाचवा...

शाळेत असताना मधल्या सुट्टीत किंवा ऑफ पिरिएडला कागदी विमाने तयार करून ती एकमेकांवर मारण्याचा खेळ आपण प्रत्येकाने खेळलेला असतो. ही विमाने तयार करण्यासाठी वह्यांचे कागद फाडले जातात. कधी कंटाळा आला तर वहीच्या मागच्या कोऱ्या पानांवर पेनाने रेघोट्या ओढणे किंवा ..

सोनटक्का

फुले सौम्य, मधुर, सुगंधित, लांब देठाची, खूप नाजूक पाकळ्यांची असतात. त्यांना हात लावायलाही भीती वाटते. त्याच्या आकार- फुलपाखरासारखा असतो, म्हणून त्याला बटरफ्लाय जींजर लिली म्हणतात. ही फुले खाली नळीसारखी आणि वर पसरट असतात...

बदके सुरेख....

बदक असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर लांब चोचीच्या पांढऱ्याशुभ्र पक्ष्यांची रांग तरंगू लागते. आपल्या डोक्यात हे एवढेच काय ते बदकाचे चित्र, त्यांचे वर्णन तयार असते. पण मित्रांनो, आपल्या या परिचित पक्ष्याचे अनेक प्रकार असतात. वेगळ्या जातीच्या बदकांची ..

निर्माल्याचं करायचं काय?

मागील आठवड्यात पुनर्वापर कचऱ्याचा या लेखात आपण कचऱ्याच्या वाढत्या समस्येबद्दल माहिती घेतली. आपल्या घरात अनेक प्रकारचा कचरा तयार होत असतो, त्यातही सण-वारांच्या वेळी होणारा ‘कचरा’ निर्माल्याचा... मग आपण तो सगळा कचरा गोळा करून प्लॅस्टिकच्या पिश..

तगर

तगर ही बारा महिने मिळणारी सदाहरित भारतीय झुडूपवर्गीय वनस्पती आहे. टाबर्नमोंटाना डायवारीकाटा असे याचे शास्त्रीय नाव. याची उंची  ७ ते ८ फुटापर्यंत असू शकते. पावसाळा व थंडीच्या दिवसात या फुलांचा विशेष बहर असतो. तगरीचे फूल आकाराने लहान, पाच पाकळ्..

पुनर्वापर कचऱ्याचा

मध्यंतरी पुण्याच्या बिशप्स स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात कुंड्यांमध्ये सुंदर रोपं होती. कौतुकाने झाडांना न्याहाळत असताना तिथल्या बाईंनी सांगितलं, “ही झाडं आमच्या मुलांनी कमावलेली आहेत.” “कमावलेली?” मी न कळून विचा..

गुलमोहर

अति वेगाने वाढणारा, अनेक लोकप्रिय वृक्षांपैकी हा पानगळी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव - डिलॉनिक्स रेजिया आणि याचे कुल (गोत्र) लेग्युमिनोसी हा मुळचा मादागास्करमधला. ..

अक्षर कसे काढावे

‘अक्षरे गाळून वाची। का ते घाली पदरिचीं। नीघा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख॥ हा श्‍लोक लिहिलेला कागद घेऊन किरण धावतच आजीजवळ आला आणि म्हणाला, ‘आजी, मला काही यात समजत नाही, काय ते सांगतेस का?  आजी : बघू, काय लिहिलं आहे? अरे! हे तर दासबो..

गुलाब

गुलाब हे सर्वांचेच आवडते फूल. आयुर्वेदात गुलाबाला तरुणी म्हणतात. ही सुप्रसिद्ध वनस्पती मनुष्यापेक्षाही प्राचीन असावी. रोमन काळात गुलाबाच्या फुलांना व्यापारी महत्त्व होते. आशिया मायनर व पश्चिम चीन यामधील भूप्रदेश गुलाबाचे मूलस्थान मानले जाते. पुराणकालीन सं..

वर्षा सहलीतील गमतीजमती

दिवाळी झाली की, सगळीकडे पर्यटनाचे वारे वाहू लागतात. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांमध्ये असणारी थंडी सर्वांनाच सहलीला जाण्यासाठी खुणावत असते. परंतु, फक्त थंडीच्या मौसमातच सहली निघतात असे नाही, तर पावसाळ्यातला निसर्ग पाहाण्यासाठीही ‘वर्षा सहलीं&rsquo..

कलाकृती- भाग १

साहित्य : रंगीत कागदाच्या पट्ट्या (2 ते 3 विरुद्ध रंग व चॉकलेटी किंवा काळा) रिकामे बॉलपेनचे रिफील (क्विलर नसल्यास) कटर, कात्री, गम, मार्कर पेन. कृती : पेपर क्विलिंगच्या पट्ट्या असतात त्याप्रमाणे कार्डपेपरच्या पट्ट्या बनवून घ्या. साधारण एक फूट बाय 1/2 सें..

मोगरा

मोगरा या भारतीय वनस्पतीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम सँबॅक असे असून हे झुडपासारखे काहीसे सरळ वाढणारे फुलझाड भारतात सर्वत्र आढळते. ते मूळचे पश्चिम भागातील असावे. याची वेलही असते ती बहरल्यावर हिरव्यागार पानात चांदण्याच लागल्या आहेत असे वाटते. फुलल्य..

जास्वंद

जास्वंदीचे वनस्पतीशास्त्रीय नाव हिबीस्कस रोझा सायानेन्सीस असे आहे. तिचा समावेश कापूस, भेंडीच्या कुळात होतो. आजूबाजूला परिसरात पटकन लाल जास्वंद दिसते पण याचे पांढरे, निळे फूल असेही प्रकार दिसतात. जगभरात याच्या प्रजाती खूप आहेत. जवळजवळ दोनशेच्या पुढेच. जास्..

रॉक गार्डन

अथांग समुद्र नजरेत सामावण्याचा प्रयत्न करत काळयाशार खडकांवर समुद्रलाटांचा वर्षाव अंगावर झेलत त्या सागरातून आकाशाला स्वत:चे रंग बहाल करत सायंकाळी सामावून जाणारा सूर्यास्त पाहायचा असेल तर आम्हा मालवणातील निसर्गपे्रमींकडे रॉक गार्डनशिवाय दुसरा कोणताही पर्याय..

देशी बार्बेक्यू

बार्बेक्यू हा शब्द हल्लीच्या काळात ऐकला नाही अशी युवा पिढीतील एकही व्यक्ती सापडणार नाही. मोकळ्या जागी शेकोटी पेटवून त्यावर किंवा रसरसत्या कोळशांवर जेवण भाजणे हा खरं तर बार्बेक्यूचा अर्थ. आता तर घरातल्या घरात बार्बेक्यू करता यावे यासाठी ग्रीलही बाजारात उपलब्ध झाले आहेत...

मला समृद्ध करणारी स्नेहसंमेलने

लग्न, मुंजी, पाहुणे-रावळे किंवा दसरा-दिवाळीसारख्या सण-उत्सवांच्या निमित्ताने वरचेवर सजणार्‍या-धजणार्‍या, नटणार्‍या-फुलणार्‍या माझ्या आजूबाजूच्या इमारती बघते तेव्हा मला हेवा वाटतो त्यांचा! मग डोक्यात विचारचक्र सुरू होतं.. मन भूतकाळात जातं....

चोवीस तासांचं गणित

सुशांत नववीतला एक हुशार, सर्वगुणसंपन्न मुलगा. अभ्यास, छंद, खेळ या सगळ्यातच अव्वल. ..

कार्य-अनुभव!!

दैनंदिन जीवनातील काही कामं पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं ..

ॲप आणि आपण

टेम्पल रन, अँग्री बर्ड्स, कॅन्डी क्रश किंवा पोकेमनची माहिती तर सर्वच मुलांना असते. म्हणून जरा हटके ॲप्स आपण पाहू या...

ॲप ओळख

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणार्‍या, विद्यार्थी मित्रांसाठी उपयुक्त ‘ॲप्स’ची माहिती तुम्हाला या सदरातून मिळेल...

बोनसाय : एक कला

बोनसाय म्हणजे मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती. पण नुसते खुजे झाड नव्हे. त्याला फळे, फुले हे सारे निसर्गातल्याप्रमाणे असायला हवे. ..

इनोव्हेशनची संजीवनी

इनोव्हेशन ही काळाची गरज आहे, त्यामुळे माणसाला सोई-सुविधा, आराम मिळतो हे सगळं तर झालंच. पण त्याचा खराखुरा जीवनदायी अनुभव जर कशातून लाभत असेल, तर तो लाभतो वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे. हजारो वर्षांपूर्वी चरक सुश्रुताच्या काळात कशा करत असतील शल्य चिकित्सा,..

निश्‍चयाचा महामेरु

साईराजला अभ्यासाला बसावसं वाटत नाही. अभ्यासाला बसला तरी त्याला वर्गातल्या गमती-जमती आठवतात. टी.व्ही. बघावासा वाटतो, चॅटिंग करावसं वाटतं, का बरं असं होत असेल त्याला? ..

वाघोबाशी गाठ

घळीपाशी आलो आणि अचानक ‘घुर्रर्र’ असा आवाज ऐकून थबकलो. तिन्हीसांजेच्या अंधारातही आम्ही त्याला ओळखलंच. तो वाघ होता...

शून्याचा शोध कुणी लावला ?

'शून्य' या शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, .....

विजयाला गवसणी घालू !!

‘मोठेपणी कोण व्हायचंय?’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात...

निसर्गानंद 

निसर्ग फुलांमधला  शाळेच्या निकालाची कामं जोरात सुरू होती. विद्यार्थी केंव्हाच परीक्षा देऊन आपल्या सुट्टीचा आनंद उपभोगत होते. वर्गात शिकवायचं नव्हतं, म्हणजे म्हटलं तर निवांतपणा होता. आपल्या सोयीने आपल्याला वर्गाचं काम केलं की झालं. हेच निवांतपण थ..

चला नकाशा वाचू या!

जगाचा नकाशा  नकाशा  भूगोल या विषयाचा प्राण आहे, तो समजून घेतला तर आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल, त्यामुळे या लेखात नकाशा म्हणजे काय? भूगोल या विषयातलं त्याच महत्त्व काय ते समजून घेऊ.  नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदाव..

वाचन एक संस्कार

वाचन संस्कार  ‘वाचन’ हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. मुलांना सर्वसाधारणपणे अवतीभवतीचे आवाज सतत ऐकून; अनुकरणातून नैसर्गिकरीत्याच ‘श्रवण’ व ‘भाषण’ ही भाषिक कौशल्य सहज आत्मसात करता येतात. उदा., मराठी भाषक समाज..

स्पर्धा कोणाशी?

दुसरा अमुक करू शकतो म्हणून मला ते आणि त्याच्यापेक्षाही चांगले करता आले पाहिजे ही चुकीची अपेक्षा आहे. मग आपण अशी अपेक्षा मुलांवर लादणे योग्य आहे का?..

स्वदेशी आणि परदेशी ...

स्थानिक झाडे  आपल्या देशात परदेशातल्या वस्तू वापरण्याचं एकप्रकारचं वेडच आहे. म्हणजे आपल्याकडची वस्तू कितीही उपयोगी असो, टिकाऊ असो पण त्याकडे डोळसपणाने दुर्लक्ष करून त्यापेक्षा महाग वस्तू वापरण्याकडेच आपला कल असतो. ..

 कोकणातल्या पाऊलखुणा ५

जिथे जसा पाऊस तिथे तसं पीक येतं, त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी केली जाते. कोकणात जवळपास सगळी शेती पावसावर अवलंबून असतो. ..

घडण पालकत्वाची : पेरणी नैतिकतेची

‘नैतिकता’ म्हटलं तर खूप अवघड संकल्पना पण रोजच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाशी जोडलेली. मुलांच्या नैतिक विकासाबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पालक कार्यशाळेत नेहमी चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे “मुलांचा नैतिक विकास आम्ही करू तरी कसा?” त्यादृष्टीने ह्या लेखाद्वारे केलेला हा एक प्रयत्न. ..

पालकत्व

कुटुंब म्हणून मुलांना आपण निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलं तर .... वाचा पालक म्हणून असणाऱ्या आपल्या समस्यांसाठी . ..

आधी मने हिरवी करू या!

पर्यावरण वाचवण्यासाठी उपक्रम होत असतानाही मूलभूत बदल मात्र नागरिकांमध्ये होत नाहीत. त्या मूलभूत बदलांविषयी... ..

  संवाद, गोष्टी आणि बरंच काही...

  ‘पालकत्व आणि समाज ’या लेखात आपण समाजाने नव पालकांसाठी सपोर्टिव्ह असायला हवं, असा आशावादी समारोप केला होता. मुलांच्या विविध संवेदना विकसित करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सहज करता येतील ते आजच्या लेखात पाहू. या ठिकाणी नोंदवलेल्या ..

कोणताही पाढा पटकन तयार...

विद्यार्थ्यांनो, सोप्या पद्धतीने पाढ्यांची उजळणी घ्यायला आलीये एक मावशी. तिच्याबरोबर पाढे शिका. ..

मुके संवाद

पक्षी प्राणीही संवाद साधतात    आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये संवाद करण्याची क्षमता असते. क्षमता म्हणणं तसं चुकीचं ठरेल कारण ते त्यांच्या परीने संवाद साधतच असतात पण आपल्याला म्हणजेच माणसाला ते कळत नसतं. किंबहुना आपणच त्यांना अज्ञानापोटी मुके जीव ही संज्ञा दिलेली आहे. का बरं? आपण त्यांना मुके म्हणायचं? कारण आपल्याला त्यांची भाषा कळत नाही म्हणून? हे जर खरं मानलं तर बाहेर देशातले सगळेच मुके म्हणावे लागतील. अगदी आपल्या नेहेमीच्या लाडक्या pets बद्दल विचार करा. ..

आवाजाची दुनिया

पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क यांसारख्या वाहिन्यांवरिल नॉडी, निंजा हातोडी, डिझी, डेक्स्टर्स लॅबमधील डीडी; बच्चेकंपनीमध्ये लोकप्रिय असलेली ही कार्टून्स दिसतात तर अफलातूनच पण, या कार्टून्सना दिलेले विशिष्ट आवाज जास्त लक्ष वेधून घेतात. छोटुकल्यांच्या दुनियेत..

पुस्तकांचं गाव...

पुस्तकांचं गाव खूप दिवस आपण एखादी गोष्ट ठरवतो तरीही ती जमत नाही आणि एक दिवस अचानक काही सुंदर भारलेले क्षण आपल्या ओंजळीत पडतात,  मग अवचित मन गुणगुणतं 'मेरे घर आना जिंदगी, जिंदगी.'      मुंबईच्या असह्य उकाड्याने त्रस्त झालेलं, कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाऊ म्हणावं तर प्रत्येक ठिकाणी जत्रा भरावी एवढी गर्दी. गर्दी टाळावी म्हटलं तर मुलांची सुटी संपून जाते असा विचित्र पेच.    काय करावं या विचारांच्या चक्रात गरगर फिरून शिमला, चंबा, नैनिताल, सापुतारा अशी ठिकांणांची ..

घडण पालकत्वाची : भावनांची बैठक 

भावनिक कंगोरे  रमा : आई, आपण रोज एक नवा खेळ आणू या.  आई :  का गं ?  रमा : अगं मला तेच तेच खेळ खेळून कंटाळा येतो.  आई : नवीन खेळ आणले तर काय होईल?  रमा : मग खूप मज्जा येईल, मला बोअर होणार नाही.    चार ..

मुक्ताई

मुक्ताई तुझी किती रूपे चितारली बाई....   पुस्तकातील पाठांमधून असो, चित्रपटांमधून असो किंवा कीर्तन-प्रवचने कानावर पडलीच असतील तर त्यातूनही असेल कदाचित.., मुक्ताई आपल्या सगळ्यांच्या ओळखीची झाली आहे, ती संत ज्ञानेश्‍वरांची बहीण म्हणूनच. आई-वडि..

भारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे

हिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं. हिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी  झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मविश्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती.   अलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं  ..

सुटी सप्ताह : ६ पिंगा आणि धांगडधिंगा

मजा. मस्ती. धमाल. हुर्रे हुर्रे... सुट्टीच सुट्टी. मजा. मस्ती. धमाल. दोन महिने फक्त आपले. आईबरोबर, ताई-दादा आणि बाबाबरोबर नुसतं खेळायचं. काय धमाल येते माहितीय का? मी, आई-बाबा आणि ताई-दादा खेळताना इतकी मजा करतो, की काही विचारू नका. कसलीच बंधन नाह..

सुटी सप्ताह: ३. घरचा समर कॅम्प

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला रे झाला की, बच्चे कंपनीचे निस्तेज झालेले चेहरे आनंदाने फुलू लागतात आणि बच्चेकंपनीसह संपूर्ण घराला सुट्टीचे वेध लागतात. बच्चेकंपनी एकीकडे आता सुट्टीत काय काय धमाल करायची याचे नियोजन करण्यात दंग होते, तर दुसरीकडे मुलांना स..

पालकत्व आणि समाज

आपण किती जागरूकपणे कोणत्या अनुभवाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर ज्याचं-त्याचं शिकणं अवलंबून असतं...

संवाद साधणारी खिडकी ...

  खिडकी...  कोणी विचारलं, बाई ग! तुला घरातील कुठली गोष्ट जास्त भावते. तर मी म्हणेल, एक म्हणजे घराला असलेलं अंगण आणि दुसरं घराला असलेली खिडकी. मुंबईसारख्या शहरात अंगण सापडून मिळणार नाही. १० बाय १० च्या घरात बेडरूम-हॉल- किचन चा अनुभव घेत असत..

सुट्टी सप्ताह: २.सुट्टीचा सदुपयोग

सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते. मुलांना समजावून घ्यायला आणि विविध गोष्टी दाखवायला हा कालावधी उत्तम असतो. ..

शोध वक्त्यांचा! 

  वक्तृत्व : एक कला  'एखाद्याचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व' अशी व्याख्या प्रा. शिवाजीराव भोसले यांनी केली आहे. खरं तर लिपीचा शोध लागण्यापूर्वी बोलणं हेच साहित्याचं प्रथम रूप होतं. महाभारतातल्या अंतिम युद्धात हतबल झालेल्या अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्णानं सगळी शस्त्र बाजूला ठेवून वक्तृत्वाचं शस्त्र हाती घेऊन गीतेचा बोध केला होता. यातूनच आपल्याला वक्तृत्वाचं महत्त्व ..

आंबा नि फणस लागतोय गोड , आणिक तोड बाई आणिक तोड

  उन्हाळा सुरू झालाय. वातावरणातला उष्मा वाढलाय. सतत  गोडसर थंडगार काही तरी प्यावंसं वाटतयं हो ना? मस्त माझा प्यावा किंवा मॅगो-मस्तानी प्यावीशी वाटते. आईस्क्रीमच्या दुकानामधे जाऊन मॅगो आईसक्रीम विथ रियल मॅगो खावा वाटतो. अगद..

मे फ्लॉवर इन मार्च....  

ऐन उन्हाळ्यात येणारे हे फुल यंदा मार्चमध्ये     माझी लेक म्हणाली, “आई मे फ्लॉवर मार्चमध्ये कसं आलं? तिच्या या प्रश्नाने मनात विचारांचं चक्र सुरू झालं. ती सहज म्हणून गेली की, “याला आता मार्च फ्लॉवर म्हणू या.” खरंच हवा..

शब्द वैभव

सगळ्यात जास्त ऐकण्याच्या माध्यमातून भाषा जास्त प्रमाणात शिकली जाते.त्यामुळे मुलांशी जितके जास्त बोलले जाईल, तितका त्यांचा शब्दसाठा वाढत जातो...

चिवचिव चिमणी...

शहराच्या बदलत्या रूपात जर आपणच हरवून चाललोय तर चिमणीची काय गत. ..

खेळ.... चौथी गरज

मुक्त खेळातून होतो तो आनंदमय विकास . तो किती गरजेचा आहे हे सांगणारा लेख ..

रंगांची उधळण.... 

आज रंगपंचमी.  रंगोत्सव. होळीत रजतमाला जाळण्याचा प्रयत्न असतो , तर रंगपंचमी म्हणजे तो प्रयत्न सफल झाल्याचा आनंद साजरा करणं असतं , तेही रंग उधळून! रंग आपल्या आयुष्यात उधाण आणतात. रंग नसतील, तर आयुष्य बेचव, निरस , कंटाळवाणं  होऊन जाईल. निसर्गापासून..

रंगात गंध, गंधात रंग!!

    नाना तऱ्हा तुझ्या किती रे मोहक चाफ्या  'चाफा' म्हटलं की, आठवतात ते फक्त कवी 'बी'च  म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते ! तसा तो पु.शी. रेगेंचा आणि जी. ए. चासुद्धा आहेच. मग उरला सुरला सगळ्यांचा! तुमचा-आमचा सगळ्यांचा. या चाफ्याचं मल..

ती ‘सावित्री’ ......

क्रांतिज्योती : सावित्रीबाई फुले     सावित्री जोतीबा फुले.आमची माय. रात्रंदिवस खस्ता खाल्लेली, समाजाकडून नाकारली गेलेली, तरी धीराने उभी राहिलेली. आभाळभर माया दिली तिने, निरपेक्षपणे. कायम आपल्या ध्येयावर ठाम राहून. ..

रंगीबेरंगी पशुपक्षी

निसर्गानं सजीवसृष्टीला रंगाचं वरदान दिलं आहे. त्यात पक्षी प्राणीही आलेच. त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठीच, त्यांच्या प्रजोत्पादनासाठी हे रंग त्यांना मदत करत असतात. ..

भाषेतून स्व-ओळख

‘भाषा’ हे संवादाचं एक प्रमुख माध्यम आहे. भाषा शिकणे म्हणजेच ती संस्कृती शिकणे. खूप लहानपणीच आसपास बोलल्या जाणाऱ्या भाषा आपण नकळत शिकत असतो. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे आणि विद्यार्थ्यांनी याचे विश्लेषण स्वत:च करायला हवे. ..

ऋग्वेदातील विज्ञान

ऋग्वेदातील विज्ञान       दचकलात ना हे शीर्षक वाचून? आपण स्वतःची एक भ्रामक समजूत करून घेतलेली असते की, ते वेदांसारखे प्राचीन ग्रंथ आपल्याला कळणार नाहीत. अगदी चुकीची कल्पना धर्म-तत्त्वज्ञान-संस्कृतीपासून ते पार खगोल ज्योतिषशास्..

घडण पालकत्वाची: शारीरिक विकास

  घडण पालकत्वाची             नमस्कार, शिक्षण विवेकच्या ब्लॉगवर तुम्हाला भेटताना खूप आनंद होत आहे.  पालकहो, आजकालची पिढी खूप स्मार्ट आहे असं सगळीकडे बोललं जात असताना आपण पालकांनी  मागे राहून कसं चालेल? आपल्यालासुद्धा स्मार्ट पालकत्व निभावण्याची वेळ आली आहे. नोकरी, व्यवसाय, इतर जबाबदार्‍या पार पाडताना  मुलांना दिला जाणारा वेळ खूप कमी झालाय. मग या वेळात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण वेळ (Quality Time) कसा दिला जाईल, याचा विचार आता आपल्याकडून ..

मोठ्याने वाचा, जग बदला

मोठ्याने वाचा, जग बदला .... अलीकडे एक्टिविटी सेंटर्समध्ये गोष्टी सांगणे, पुस्तक वाचनाचे प्रयोग यासाठीच होत असतात. आपण पूर्वीचं आठवून पाहिलं, तर आपल्या आजीनं पोथीचा सामूहिक पारायण मोठ्यानं वाचून केलेलं असतं. ..

मन आनंदी तर जीवन आनंदी

  आनंदी मन  डॉ. पुरंदऱ्याचं ‘शल्य – कौशल्य’ पुस्तक वाचत होते. डॉ. पुरंदरे रक्त विरहीत (bloodless surgery)करण्यातले मान्यवर. म्हणजे ते इतक्या हलक्या हाताने आणि कौशल्याने शस्त्रक्रिया करत की, कमीतकमी रक्तस्त्राव होई. रुग्णल..

सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

    पालकांचा दर्जात्मक वेळ  "ममा तुला पगाराचे किती पैसे मिळतात?तू जर नोकरी नाही केलीस, तर एकट्या बाबाच्या पगारात आपलं भागणार नाही का?मी हट्ट करणार नाही,मला तुझे पैसे नकोत,पण तू हवी आहेस ममा. प्लीज नोकरी सोड नं." डोळ्यांत पाणी आणून, अ..

सोनेरी सकाळ

       उगवता सूर्य :सोनेरी सकाळ काही वर्षांपूर्वी  ‘स्वामी विवेकांनंद योगसंस्था’ या संस्थेतर्फे लहान मुलांसाठी एका टेकडीवर सांघिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला होता. माझा मुलगा ‘स्वानंद&r..

पालकत्व नव्याने अनुभवताना

आम्ही सिंगापूरला आलो, तेव्हा विहान जेमतेम अडीच वर्षांचा होता. सिंगापूरला जायचा हा निर्णय तसा फारच अचानक घेतला गेला होता, त्यामुळे विहान तिथे राहील का? आम्हाला तिथे करमेल का? शाळा, वातावरण सगळं चांगलं असेल का? ..