साहित्य : पातळ पोहे, किसलेले गाजर, बीट, मोड आलेले हिरवे मूग, खोबर्याचा चव, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कोबी, मुठभर डाळं, चवीप्रमोण मीठ व साखर, लिंबाचा रस, फोडणीचे साहित्य.
कृती : एका वाटीमध्ये पातळ पोहे घ्या. त्यात मोड आलेले हिरवे मूग, किसलेले गाजर, बीट घाला. त्यानंतर ओल्या खोबर्याचा चव भरपूर घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कोबी घाला. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून वरून थोडे लिंबू पिळा.
..